Chhagan Bhujbal On RSS Comment Against Ajit Pawar Group: आपल्या स्पष्ट भूमिकेसाठी राज्यातील राजकारणामध्ये कायमच चर्चेत असलेले नेते म्हणजे छगन भुजबळ! अजित पवार गटातील नेते तसेच राज्यातील मंत्री असलेल्या भुजबळ यांची मागील काही काळापासून सातत्याने चर्चा होताना दिसतेय ती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. लोकसभा निवडणुकीमध्ये तिकीट नाकारलं गेल्यानंतर राज्यसभेच्या जागीही अजित पवार गटाने सुनेत्रा पवारांना संधी दिली आहे. त्यामुळेच आता भुजबळ पुन्हा चर्चेत आहेत. याच पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना भुजबळांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अजित पवार गटावर झालेल्या टीकेवरही प्रतिक्रिया नोंदवली आहे. अजित पवार गटामुळे 48 जागांवर परिणाम झाल्याची टीका पटत नसल्याचं भुजबळांनी म्हटलं आहे.


'400 पार'चा फटका बसला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभेत दलित मतदार आणि मुस्लीम मतदार महायुतीकडे आला नाही. घटनाबदल प्रचाराचाही परिणाम झाला का? या प्रश्नावर छगन भुजबळांनी, "महायुती का मागे पडली याचं काहीतरी विश्लेषण, अभ्यास झाला पाहिजे. मात्र मीच काय मुख्यमंत्री आणि बाकीचे नेतेही तेच म्हणू लागले की 400 पार म्हटल्याने लोकांना असं वाटलं की संविधानात बदल केला जाणार. असा प्रचार केला गेला आणि तो प्रचार लोकांच्या मनामध्ये बसला. अनेक समाज दूर गेले. मुस्लीम समाज तर दूर गेलाच होता," असं म्हटलं. 


संघाने केलेल्या टीकेवरुन टोला


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अजित पवार गटाला सोबत घेतल्याने भाजपाचे कार्यकर्ते नाराज झाल्याचा फटका लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये महाराष्ट्रात पाहायला मिळाल्याचं म्हटलं आहे. याचा संदर्भ देत भुजबळांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आम्हाला खरं तर दोनच जागा लढावता आल्याने या दोन जागांचा 48 जागांवर परिणाम झाला, ही टीका पटत नाही, असं म्हटलं. "48 पैकी आम्हाला 4 जागा दिल्या गेल्या. त्यापैकी दोन तर शिरुर आणि परभणी अशाच गेल्या. आमच्या वाटल्याला आल्या दोन जागा रायगड आणि बारामती. एका जागी आम्ही जिंकलो आणि एका जागी पराभूत झालो. तर त्याचा 48 जागांवर परिणाम झाला असं कसं म्हणू शकता?" असा प्रतिप्रश्न भुजबळांनी उपस्थित केला आहे.


नक्की वाचा >> वरळीत ठाकरे विरुद्ध ठाकरे? आदित्य ठाकरेंविरुद्ध लढणाऱ्या मनसे उमेदवाराचं नावही आलं समोर


उत्तर प्रदेशमधील कामगिरीचा उल्लेख


"आम्हाला खरं तर दोनच जागा मिळाल्या. दुसरी गोष्ट, थोडीशी पिछेहाट झाली आहे. देशातील इतर राज्यांमध्येही हे झालं आहे. उत्तर प्रदेशात असं झालं. उत्तर प्रदेशात भाजपा एवढ्या मागे येईल तिथे असं कोणालाच वाटलं नव्हतं. त्यामुळे अजित पवार गटामुळे झालं असं मला योग्य वाटत नाही," असं भुजबळ म्हणाले.


नक्की वाचा >> लोकसभा, राज्यसभा दोन्ही वेळेस तुमच्यावरच अन्याय का? भुजबळ म्हणाले, 'मला काही...'; घराणेशाहीवरही भाष्य


अधिवेशनानंतर महायुती दिसणार नाही?


"15 ते 20 दिवसात महायुती दिसणार नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर तिन्ही पक्ष वेगळे होतील असा रोहित पवारांचा दावा आहे," असं म्हणत भुजबळांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न पत्रकारांनी केला. यावर बोलताना भुजबळांनी, " त्यांनी भविष्य कुठे पाहिलं याची मला काही कल्पना नाही. मी पाहिलेल्या भविष्यात तसं काही दिसत नाही," असं सांगितलं.