चेतन कोळस, झी मीडिया, येवला: 'आमच्या इकडची आंब्यांची झाडं तुमच्या इकडे लावा याकरिता तर नाही ना संभाजी भिडे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट झाली असावी...'' असं छगन भुजबळ यांनी येवला दौऱ्यावर असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली. संभाजी भिडे व मुख्यमंत्री यांच्या भेटीप्रसंगी भुजबळ (Chhgan Bhujbal) यांना विचारले असता भुजबळ म्हणाले की.. संभाजी भिडे यांनी मागे वक्तव्य केले  होते की आमच्या इकडचे आंबे खा मुलं होतील व आपण बघितले की मुख्यमंत्री देखील शेतात काम करतात ही चांगली गोष्ट आहे मात्र मुख्यमंत्री व संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांना भेटायला गेलो याचा अर्थ असा की आमच्या इकडचे आंबे तिकडे घेऊन जा तिकडे आंब्याचे झाडे लावा असा तर नाही ना?, याकरता मुख्यमंत्री व संभाजी भिडे यांची भेट झाली असावी, हे मनोवादी लोक असून त्यांच्या नादी लागणं काही कामाचं नाही, असे भुजबळ म्हणाले. (chhagan bhujbal targets sambhaji bhide and chief minister eknath shine in a press conference)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) काळात अनेक बँक घोटाळे झाले असून याबाबत चौकशी करता मुख्यमंत्र्यांनी(CBI) सीबीआयला प्राचारण केले आहे याबाबत भुजबळ यांना विचारले असता भुजबळ म्हणाले की... ''मला हे कळत नाही की अगोदरच्या सरकारमध्ये देखील चौकशी येऊन क्लीन चिट मिळालेली असताना परत नंतर सरकार बदलल्यावर तिच माणसं, तीच चौकशी यंत्रणा असून का चौकशी परत केली जातेय, मला काही कळत नाही, माझ्या बाबतीत देखील असं झालं आहे. 


हेही वाचा - Video : घराला लागली आग! लग्नासाठी जमवलेले 85 हजार रोख पैसे आणि सोने जळून खाक


महाराष्ट्र सदन बाबत मला क्लीन चिट (Clean Chit) मिळाली असून परत चौकशी करता तेच अधिकारी आले. एकदा निर्णय झाल्यानंतर परत त्याच गोष्टी उकरून काढायच्या हे सरकारला काही कळत नाही? (Maharashtra Politics)


हेही वाचा - Video : घराला लागली आग! लग्नासाठी जमवलेले 85 हजार रोख पैसे आणि सोने जळून खाक


अजून एक प्रकल्प मुंबईला (Mumbai) गेला याबाबत भुजबळांना विचारला असता भुजबळ म्हणाले की एकामागे अनेक प्रकल्प गुजरातला चालले असून यामागे देखील अनेक प्रकल्प गुजरातला गेले आहे यामागे मुंबईचे महत्व कमी करण्याचे काम चालू असून काही दिवसांवरच गुजरात येथे निवडणुका असल्याने हे (vedanta foxconn) प्रकल्प गुजरातला (Gujraat) नेले जात आहे, तरी मुंबईचे महत्व हे कमी करण्याचे कारस्थान चालू आहे असे भुजबळ म्हणाले तरी महाराष्ट्राचे (Maharashtra) प्रकल्प हे नेले जात आहेत ते स्वतःच्या मर्जीने जात नसल्याचे भुजबळ बोलत होते.