छगन भुजबळ जेलमध्ये असताना शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे; सर्वात मोठा राजकीय गौप्यस्फोट
छगन भुजबळ जेलमध्ये असताना शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे. रमेश कदम यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.
Chhagan Bhujbal On Sharad Pawar : अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी पक्ष फुटला आहे. अजित पवार यांचा मोठा गट शिंदे फडणवीस सरकारसोबत सत्तेत सहभागी झाला. याच गटात राष्ट्रावदीचे नेते छगन भुजबळ देखील आहेत. छगन भुजबळ यांना मंत्रीपद देखील मिळाले आहे. छगनभुजबळ यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आला आहे. छगन भुजबळ जेलमध्ये असताना शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे असा खळबळजन गौप्यस्फोट राष्ट्रावादीचे माजी आमदार रमेश कदम यांनी केला आहे.
रमेश कदम यांनी छगन भुजबळ यांच्यावर नेमके काय आरोप केलेत?
छगन भुजबळ जेलमध्ये असताना शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे, असा खळबळजनक गौप्यस्फोट माजी आमदार रमेश कदम यांनी केला आहे.
भुजबळ आणि रमेश कदम जेलमध्ये होते एकत्र
भुजबळ आणि रमेश कदम काही काळ जेलमध्ये एकत्र होते. जेलमधून बाहेर आल्यानंतर आता कदम पुन्हा पंढरपूरच्या राजकारणात सक्रीय झालेत. त्यांनी भुजबळांचे जेलमधले किस्से सांगताना मोठा बॉम्ब टाकला. जामीन झाला नाही तर वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल, अशी ब्लॅकमेलिंग भुजबळ करायचे, असा दावा कदमांनी केलाय.. जेलमध्ये भुजबळ रोज आजारी पडायचे. आताचे भुजबळ खूपच फीट आहेत. आजारपण दाखवून त्यांनी सहानुभूती मिळवली, असंही कदम म्हणाले. दरम्यान या आरोपांवर छगन भुजबळ उद्या पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार आहेत.
रमेश कदम यांना 2015 साली होती अटक
रमेश कदम यांच्यावर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी बोगस लाभार्थी दाखवून आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप होता. तसंच सोलापूर संभाजीनगरासह राज्याच्या विविध ठिकाणी त्यांच्यावर आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप ठेवत 2015 साली अटक करण्यात आली. आठ वर्षांनंतर त्यांना जामीन मंजूर झालाय. 2014 ते 2019 पर्यंत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोहोळ विधानसभा मतदार संघाचे आमदार होते. त्यानंतर 2019 साली त्यांनी जेलमधून अपक्ष उमेदवारी अर्ज भरत मोहोळ विधानसभा निवडणूक लढवली. मात्र त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांना धक्का
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांना धक्का बसलाय. बारामतीतील बारामती अॅग्रो या प्लॅन्टवर रात्री 2 वाजता महाराष्ट्र प्रदूषण विभागाने कारवाई केली. रात्री २ वाजता नोटीस देऊन बारामती अॅग्रोचे दोन प्लांट बंद करण्याचे निर्देश देण्यात आलेत. 72 तासांत प्लांट बंद करण्यासाठी 72 तासांची मुदत देण्यात आलीय. दरम्यान आमदार रोहित पवार यांनी स्वतः ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. ही कारवाई सूडापोटी झाल्याचं आमदार रोहित पवार यांनी ट्विट केलंय.