Chagan Bhujbal On Maratha Reservation : शिंदे समितीचं काम संपल्यानं ती बरखास्त करावी या मागणीवर मंत्री छगन भुजबळ ठाम असल्यानं वाद वाढण्याची शक्यता आहेत. कुणबी नोंद असलेल्यांना प्रमाणपत्र देण्यास हरकत नाही. मात्र सरसकट मराठ्यांना प्रमाणपत्र देण्यास भुजबळांनी विरोध केला आहे. शिंदे समिती बरखास्त करण्याच्या भुजबळ यांच्या मागणीला सर्व पक्षीय नेत्यांनी विरोध केला आहे.  


शिंदे समिती बरखास्त झाली नाही तर राजीनामा द्या - बच्चू कडू यांचे चॅलेंज


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिंदे समिती बरखास्त झाली नाही तर राजीनामा द्या, असं आव्हान बच्चू कडूंनी भुजबळांना दिलंय. छगन भुजबळांनी शिंदे समिती बरखास्त करण्याची मागणी केली होती. त्यावर आता प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत. भुजबळांनी तोडण्यापेक्षा लोकांना जोडता कसं येईल हे पहायला पाहिजे असा सल्ला बच्चू कडू यांनी छगन भुजबळांना दिलाय. तर, तायवाडे यांच्या हातपाय तोडण्याच्या वक्तव्याचा कडूंनी निषेध केला आहे. नळावरच्या भांडणासारखं भांडायला लागलेत याचं नवल वाटत असल्याचा खोचक टोलाही त्यांनी लगावलाय. शिंदे समिती रद्द झाली नाही तर भुजबळांनी राजीनामा द्यावा. असंही ते यावेळी म्हणालेत.ओबीसी मेळाव्याबाबत प्रतिक्रिया देताना बच्चू कडू यांनी ओबीसी नेत्यांचे कान टोचलेत.


शिंदे समिती बरखास्तीवरून मंत्र्यांमधले मतभेद उघड


न्या. शिंदे समिती बरखास्तीवरून मंत्र्यांमधले मतभेद उघड झाले आहेत. शिंदे गट आणि अजित पवार गटातल्या मंत्र्यांनी भुजबळांच्या भूमिकेला विरोध करत टीका केलीय. शिंदे समिती नेमण्याचा निर्णय मंत्रिमंडळात एकमतानं झाला होता. आणि त्या बैठकीला भुजबळही उपस्थित होते. त्यामुळे त्यांनी चार भिंतीतल्या गोष्टी अशा चव्हाट्यावर जाऊन बोलणे योग्य नसल्याची टीका इतर मंत्र्यांनी केली. 


भुजबळांच्या मागणीवर शिंदेंनी थेट बोलणं टाळलं


मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय होणार नाही अशी ग्वाही पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलीय. भुजबळांसोबत आरक्षणाबाबत चर्चा झालेली असून त्यांना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नसल्याचं आश्वस्त करण्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मात्र न्या. शिंदे समिती बरखास्त करण्याच्या भुजबळांच्या मागणीवर शिंदेंनी थेट बोलणं टाळलं. 


शिंदे समिती बरखास्तीची मागणी भुजबळांनी कॅबिनेटमध्ये करावी


शिंदे समिती बरखास्तीची मागणी भुजबळांनी कॅबिनेटमध्ये करावी असं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी भुजबळांना दिलंय. तर सरकार तरुणांमध्ये वाद निर्माण करत असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी केलीय. 


भुजबळ एकाकी पडलेत की काय?


भुजबळ एकाकी पडलेत की काय, असा प्रश्न पुन्हा पडू लागलाय. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ आज पुण्यात होते. पण दोघांचीही भेट झाली नाही. व्हीआयपी विश्रामगृहावर या दोन नेत्यांची भेट होणार असल्याची चर्चा होती मात्र 
अजित पवारांचा ताफा न थांबता  निघुन गेल्याचं समजत.