Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : संभाजीनगर क्रीडा संकुल घोटाळ्याचा गुंता दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यातच घोटाळ्याचा मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागर अजूनही फरार आहे. 11 दिवस झाले तरीही हर्षकुमारचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. हर्षकुमारची मैत्रिण अर्पिता वाडकरला पोलिसांनी अटक केलीय. तिची चौकशीही कऱण्यात आलीय. आतापर्यंत चार आरोपींना अटक कऱण्यात आलीय. मात्र मुख्य आरोपी आहे तरी कुठे असा प्रश्न आता पडलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रीडा संकुल घोटाळ्याचं कनेक्शन वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मात्र मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागर पोलिसांच्या हाती लागणं त्यासाठी गरजेच आहे.  हर्षकुमारनं पोलिसांना पत्र लिहून आपण घोटाळ्याचे आरोपी नसल्याचं सांगितलं मात्र तो जोपर्यंत हाती लागत नाही तोपर्यंत घोटाळ्याचा मास्टरमाईंड कोण हे समोर येणार नाही 


हर्षकुमारनं 21 कोटींचा गोलमाल केलाय. त्यातल्या 17 कोटींचा हिशोब पोलिसांनी कोर्टाला सादर केलाय.. हर्षकुमारकडे कोट्यवधीची संपत्ती असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.  हर्षकुमारनं कंत्राटी एजन्सीचा व्यवस्थापक  नागेश डोंगरेला 80 लाख रुपये  दिलेत.  तर अटकेत असलेल्या यशोदा शेट्टी आणि त्यांच्या पतीकडे 2 कोटी रुपये असल्याचं तपासातून समोर आलंय. साडेचार कोटींचा हिशोब लागलेला नाही. त्यामुळे घोटाळ्यातील ही रक्कम कुणाकडे आहे हाच खरा सवाल आहे. या साडेचार कोटींचा माग काढणं पोलिसांसमोर आव्हान असणार आहे.


हर्षकुमार क्षीरसागरकडे सापडलेली संपत्ती


1.35 कोटींची बीएमडब्ल्यू कार
-1.20 कोटी रुपयांचे वडिलांचे 4 फ्लॅट
-1 कोटी खर्च करून घरात इंटिरियरचं काम
-बँक खात्यात 3 कोटींची रक्कम
-चीनमधून 50 लाखांची खरेदी
-40 लाखांच्या 2 स्कोडा कार
-32 लाखांची बीएमडब्ल्यू बाईक
तर दुसरीकडे हर्षकुमारची मैत्रिण अर्पिता वाडकरकडेही कोट्यवधींची संपत्ती सापडलीय 
संभाजीनगरच्या चिखलठाण्यात 1.35 कोटींचा फ्लॅट
- मुंबईत 1.05 कोटींचा फ्लॅट
- 1.44 लाखांचा आयफोन
-15 लाखांची स्कोडा गाडी
- 1.09 लाखांचा स्मार्टफोन
- 3 बँका खात्यात 1 कोटी 1 लाख रुपये