Chhatrapati Sambhajinagar: डॉक्टरांच्या चुकीमुळे एका चिमुकल्याचा प्राण गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या साडेपाच वर्षातच त्याची प्राणज्योत मालवली. छत्रपती संभाजीनगर शहरातील गारखेड्यातील वेदांत बाल रुग्णालयात ही घटना घडली आहे. साडेपाच वर्षाच्या चिमुकल्यावर ऑपरेशन थिएटरमध्ये उपचार सुरु होते. यावेळी डॉक्टरांनी चुकीचे उपचार झाल्याने चिमुकल्याला आपला प्राण गमवावा लागला. वेदीक असे या मुलाचे नाव आहे. शासकीय रुग्णालय असलेल्या घाटीतील समितीचा अहवाल समोर आला आहे. यात डॉक्टरांवर ठपका ठेवण्यात आला आहे. यानंतर 6 डॉक्टरांवर पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. धक्कादायक म्हणजे चिमुकल्याचा मृत्यू 24 एप्रिल 2024 रोजी झाला असतांना, डॉक्टरांनी त्याला 11 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवले होते. 


नेमकं काय घडलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

26 एप्रिल रोजी वैदिकचे किरकोळ ऑपरेशन केल्याचे डॉक्टरांनी सांगितले. परंतु ऑपरेशननंतर वैदिक शुद्धीवर आलाच नाही.त्याच्यावर 6 मे पर्यंत आयसीयूत उपचार सुरू होते. पुढे 6 मे रोजी दुपारी साडेतीन वाजता त्यास डॉक्टरांनी मृत घोषित केले.


काय आहेत आरोप?


ऑपरेशन केल्यानंतर बाहेर आणलेला दैविक थोड्या वेळाने शुद्धीवर येईल, असे म्हणत डॉक्टरांनी 10 दिवस पालकांना उडवाउडवीची उत्तरे दिली. तो शेवटपर्यंत शुद्धीवर आलाच नाही. दवाखान्यातील सर्व डॉक्टर आणि नर्स यांनी काही वेळापूर्वी त्याने डोळे उघडले होते, हातपाय हलवले होते, आता तो झोपलेला आहे'', अशी चुकीची माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. 


अहवालात नेमकं काय?


दैविकला ऑपरेशनपूर्वी डॉक्टरांनी 'स्पाईनमध्ये भूल देण्यात आली होती. मात्र ऑपरेशन सुरू असताना बाळाने हात हलवल्यानंतर डॉ. शेख इलियास यांनी बाळाला झोपेचे इंजेक्शन दिले.सीसीटीव्हीत ते तीन इंजेक्शन देताना दिसत आहे. ते तीन इंजेक्शन नेमके कशाचे? याचा उल्लेख उपचाराच्या कागदपत्रांमध्ये नाही, असे उच्चस्तरीय समितीच्या अहवालात म्हटले आहे. या घटनेनंतर नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय.