महागाईचा भडका । होळीच्या तोंडावर चिकन महागलं, मिरचीचाही ठसका
chicken prices hike : सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी. होळीच्या तोंडावर चिकन महागले आहे. वसई विरारमदध्ये चिकनचे दर 300रुपये किलोवर गेले आहेत. तर दुसरीकडे ठाण्यात मिरचीचा ठसका चांगलाच उधळला आहे.
मुंबई : chicken prices hike : सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी. होळीच्या तोंडावर चिकन महागले आहे. वसई विरारमदध्ये चिकनचे दर 300रुपये किलोवर गेले आहेत. तर दुसरीकडे ठाण्यात मिरचीचा ठसका चांगलाच उधळला आहे. हिरव्या मिर्चीच्या (chilli prices hike ) दरांनी घाऊक बाजारात शंभरी पार केली आहे.
चिकन महागले असताना त्यातच कोंबड्याचं खाद्यही महागले आहे. तसेच बर्डफ्लूनंतर कोबड्यांचे उत्पादन घटल्याने ही दरवाढ करण्यात आली आहे. तर दुसरीकडे कुक्कुटखाद्य महाग झाल्याने अंडीही महागण्याची शक्यता आहे. पक्ष्यांना लागणाऱ्या खाद्याच्या दरात सुमारे 60 टक्के वाढ झाली आहे. प्रत्येक अंड्यामागे सव्वा रूपये तोटा होत असल्यामुळे अंड्याचे दर वाढण्याची शक्यता आहे.
ठाण्यात मिरचीचा दरात वाढ झाली आहे. हिरव्या मिर्चीच्या दरांनी घाऊक बाजारात शंभरी पार केली असुन, किरकोळ बाजारात मुठभर मिरचीसाठी वीस ते तीस रुपये मोजावे लागत आहेत. अवकाळी पाऊस, दिवसेंदिवस वाढलेल्या पेट्रोल,डिझेल आणि CNG च्या दरामुळे ठाणे-मुंबईमधील भाजी मंडईत होणाऱ्या आयात आणि निर्यातींवर होऊ लागला आहे.
40 ते 50 रुपये किलो मिळणारी हिरवी मिर्ची आता किरकोळ बाजारात 150 ते 160 रुपयानं विकली जात आहे. वाढत्या महागाईने सर्व सामान्य घरातील गृहिणींचे बजेट पूर्णत: कोलमडलेले दिसून येत आहे. त्यामुळे सरकारवर नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, महागाईची झळ आता मॅगीलाही बसली आहे. मॅगी महागली आहे. दोन मिनिटांत होणाऱ्या मॅगीच्या किमतीत दोन रुपयांनी वाढ झाली आहे. आजपासूनच मॅगीच्या नव्या किमती लागू झाल्या आहेत. नेस्ले इंडिया कंपनीनं मॅगी महाग झाल्याची घोषणा केलीय. आता मॅगीचा 12 रुपयांचा पॅक 14 रुपयांना मिळणार आहे. मॅगीच्या उत्पादन खर्चात वाढ झाल्याने मॅगी महागली आहे.