महापालिका निवडणूक कधी होणार? फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले, `मी वकिलांना...`
Devendra Fadnavis on Municipal Election: लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आता महापालिका निवडणुका (Municipal Election) कधी होणार? याची सर्वांना उत्सुकता आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याचं उत्तर दिलं आहे.
Devendra Fadnavis on Municipal Election: लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आता महापालिका निवडणुका (Municipal Election) कधी होणार? याची सर्वांना उत्सुकता आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याचं उत्तर दिलं आहे. लवकरात लवकर या निवडणुका व्हाव्यात यासाठी आमचा प्रयत्न असेल असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. तसंच मी यासंदर्भात सरकारी वकिलांशी चर्चा केल्याचं त्यांनी सह्याद्री वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
राज ठाकरेंना विधानसभेत अपयश मिळाल्यानंतर फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले 'त्यांना सरकारसोबत...'
महापालिका, जिल्हा परिषदा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित असून ही प्रक्रिया लवकर सुरु होईल का? असं विचारलं असता ते म्हणाले, "आम्हालाही अपेक्षा आहे. एका सुदृढ लोकशाहीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न होणं चुकीचं आहे. सुप्रीम कोर्टात ते अडकलं आहे. आमचा पूर्ण प्रयत्न असेल. मी कालच आमच्या सरकारच्या वकिलांशी बोललो आहे. तुम्ही लवकर सुनावणीसाठी अर्ज करा, आणि कोर्टाला स्थगिती हटवण्याची विनंती करा असं त्यांना सांगितलं आहे. लवकरात लवकर या निवडणुका व्हाव्यात यासाठी आमचा प्रयत्न असेल".
पालिका निवडणुकीत राज ठाकरेंशी युती होणार?
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना विधानसभेत फार यश मिळालं नाही, तसंच महापालिका निवडणुकीत राज ठाकरे आणि महायुती एकत्र येईल का? असं विचारलं असता देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की, "लोकसभेत त्यांनी आम्हाला खुल्या दिलाने पाठिंबा दिला होता. त्याचा आम्हाला फायदाही झाली. विधानसभेत आमच्या लक्षात आलं त्यांच्यासमोर प्रश्न आहे की, त्यांचा पक्ष आहे आणि त्यांच्या लोकांनी निवडणुका लढल्याच नाहीत तर पक्ष चालणार कसा? आम्ही तीन पक्ष असल्याने आमच्याकडे त्यांना देण्यासाठी जागा नव्हत्या. वस्तुस्थिती समजून त्यांनी विरोधात लढण्याचा निर्णय घेतला".
पुढे ते म्हणाले, "इतक्या मोठ्या प्रवाहाविरोधात लढूनही त्यांना चांगली मतं मिळाली आहे. त्यांच्या अनेक उमेदवारांनी चांगली मतं घेतली आहेत. त्यांचे आणि आमचे विचार मोठ्या प्रमाणात मेळ. त्यामुळे त्यांना सरकारसोबत ठेवण्यात आम्हाला रस, आनंद आहे. महापालिकेच्या निवडणुकीत जिथे शक्य असेल तिथे सोबत आता आलं तर प्रयत्न करु".