पिंपरी-चिंचवड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'अटल संकल्प महासंमेलनात शिवसेनेला थेट अंगावर घेतले. त्याचवेळी कडक शब्दात इशाराही दिलाय. त्यामुळे भाजपसोबत शिवसेनेची युती होणार की नाही, याची उत्सुकता शिगेला पोहोचलेय. मोदी पाठिंबा देणारे उमेदवार निवडून आणू. त्याचवेळी ते सोबत आले तर ठिक आहे. अन्यथा आमचे उमेदवार तयार आहेत, अशा शब्दात इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सेनेला दिलाय. त्याचवळी मावळ लोकसभा मतदार संघावर भाजपकडून दावा करण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल चढवला. दोन्ही काँग्रेसने एका व्यासपीठावर समोरासमोर यावे. त्यांच्या १५ वर्षांतील आणि आमच्या चार वर्षांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घ्यावा. त्यामध्ये आम्ही उजवे ठरलो नाही तर, आगामी निवडणुकांना सामोरे जाणार नाही, असे आव्हानही फडणवीस यांनी यावेळी दिले.  


तुमच्या काळातील सिंचनाच्या वाढीव दराच्या निविदा आम्ही रदद् केल्या. तुम्ही सिंचनाचा पैसा लाटला. सिंचन मात्र झालं नाही, असा टोला राष्ट्रवादीला मुख्यमंत्र्यांनी हाणला. दरम्यान, पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामं न्यायालयाच्या निर्णयानुसार नियमित करणार आहोत, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.


मावळ आणि शिरुरमधून तेच खासदार निवडून जातील जे नरेंद्र मोंदींना पाठींबा देतील. ते देणार असतील तर आम्ही त्यांच्या सोबत आहोत. ते देणार नसतील तर आमचे उमेदवार तयार आहेत, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला दिलाय. युती झाल्यास दोन्ही मतदारसंघ सेनेकडे, युती न झाल्यास स्वबळावर निवडून येण्याची तयारी आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र, दानवे आणि फडणवीस यांनी शिवसेनेवर थेट बोलायचे टाळले. युतीसाठी आम्ही तयार अन्यथा आम्ही स्वबळावर लढायला तयार अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली.


दानवेंचा अजित पवारांना इशारा


ज्यांनी सिंचन घोटाळा केला त्यांच्या दारात पोलीस उभे आहेत, त्यांना कधीही अटक होऊ शकते, असा असा थेट इशारा भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना येथे दिला.


सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवारांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. त्यांच्या दारात पोलिस उभे आहेत, असे प्रतिपादन  दानवे यांनी  येथे केले. शहर भाजपच्यावतीने निगडी, प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदानावर आयोजित 'अटल संकल्प महासंमेलनात दानवे बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील,  पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, भाजप शहाराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, बाळा भेगडे, प्रशांत ठाकूर आदी उपस्थित होते.