CM Eknath Shinde : 101 सरपंच, 34 नगरसेवक आणि...मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा दावा
CM Eknath Shinde : परभणी जिल्ह्यात शिंदे गटाला एक ही आमदार किंवा खासदार फोडता आला नसला तरी शेकडो सरपंच, नगरसेवक, कार्यकर्ते मात्र शिंदे गटात सहभागी लागले आहेत. शिवसेना नेते सईद खान यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी परभणीच्या शेकडो जणांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केल्याचा दावा करण्यात आला आहे.
Maharashtra Politics News : केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना जबरदस्त झटका दिला. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे शिवसेना (shivsena) आणि धनुष्यबाण (Dhanushyaban) चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या हातातून गेले आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे दोन्ही एकनाथ शिंदे यांना मिळाले आहे. शिवसेना पक्ष ताब्यात आल्याने शिंदे गटाची ताकद वाढली आहे. शिंदे गटाला मिळणारा पाठिंबा वाढत आहे. शिंदे गटात मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होत आहे. या पक्ष प्रवेशाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मोठा दावा केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या शिंदे गटात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु आहे. विविध पक्षातील 101 सरपंच, 34 नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचा दावा करण्यात आला आहे. मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
परभणी जिल्ह्यात शिंदे गटाला एक ही आमदार किंवा खासदार फोडता आला नसला तरी शेकडो सरपंच, नगरसेवक, कार्यकर्ते मात्र शिंदे गटात सहभागी लागले आहेत. शिवसेना नेते सईद खान यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी परभणीच्या शेकडो जणांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केल्याचा दावा करण्यात आला आहे.
यात विविध पक्षातील 101 सरपंच, 34 माजी नगरसेवक, शेकडो महिला पुरुष पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्याची माहिती शिंदे गटाचे नेते सईद खान यांनी दिली आहे. शिंदे गटाचा जनाधार वाढत असून स्थानिक स्वराज्यच्या निवडणुकात शिंदे गट ही प्रभावी दावेदार मानला जाऊ लागला आहे.
महाविकास आघाडीच्या सभांना प्रत्युत्तर देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची रणनीती
महाविकास आघाडीच्या सभांना प्रत्युत्तर देण्याची रणनीती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं आखली आहे. मविआची संभाजीनगरमध्ये येत्या 2 एप्रिलला पहिला जाहीर सभा होणार आहे. तर, अयोध्या दौ-यानंतर मुख्यमंत्री शिंदे 8 एप्रिलला संभाजीनगरातच प्रत्युत्तर सभा घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ज्याठिकाणी बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, उद्धव ठाकरेंच्या सभा झाल्या, त्याच मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर मुख्यमंत्री शिंदे सभा घेणार आहेत. मराठवाड्यातील काही नेत्यांना शिवसेनेत प्रवेश देऊन ठाकरे गट आणि काँग्रेसला धक्का देण्याची तयारी शिंदे गटानं चालवल्याचे समजते.