Balasaheb Thackeray Death Anniversary:  बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येलाच स्मृतीस्थळावर शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार राडा झाला. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अभिवादन करून गेल्यानंतर हा राडा झाला. ठाकरे आणि शिंदे गटातल्या शिवसैनिकांनी एकमेकांविरोधात भिडले आणि जोरदार घोषणाबाजी केली.  बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी झालेल्या राड्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतापले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर झालेल्या राड्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलेच संतापले आहेत. ठाकरे गटाच्या लोकांनी महिलांशी असभ्य वर्तन केले आमच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.  
ही घटना निंदनीय आहे असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी संताप व्यक्त केला. 


बाळासाहेब ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळी झालेली घटना दुर्दैवी आणि निंदनीय आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी झी २४ तासशी बोलताना व्यक्त केली. वाद नको म्हणून आपण आदल्या दिवशी दर्शनाला आलो. मात्र तिथं असं गालबोट लावणं ही कुठली संस्कृती आहे, असा सवाल शिंदेंनी केला.


17 नोव्हेंबरला बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी होते. यामुळे आम्ही आदल्या दिवशी दर्शनासाठी आलो.  आम्ही अभिवान करुन निघत होतो. उद्धव ठाकरे गटाच्या लोकांना तिथे येण्याची गरजच नव्हती. ठाकरे गटाच्या लोकांनी येते गोंधळ घातला.   कायदा हातात घेवू नये.  बाळासाहेबांच्या स्मृती दिनाला गालबोट लावू नये असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे गट आणि शिंदे गटाला शांतेतचे आवाहन केले आहे. 


शिवसेना ठाकरे आणि शिंदे गट यांच्यातल्या राड्यामुळं बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं नुकसान झालं.. यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, शीतल म्हात्रे उपस्थित होते. तर ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब उपस्थित होते.