मुख्यमंत्री केजरीवाल सिंदखेडराजा दौऱ्यावर
आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा दौऱ्यावर आहेत
बुलडाणा : आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा दौऱ्यावर आहेत
सभा घेणार
या दौऱ्यात केजरीवाल आज सकाळी १० वाजता मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील जिजाऊ मातेच्या पुतळ्याच दर्शन घेणार आहेत. सिंदखेडराजा येथेच सभा देखील घेणार आहेत.
कार्यकर्त्यांनी केल स्वागत
केजरीवाल आज सकाळी ८ वाजता औरंगाबाद मधून सिंदखेडराजाकडे प्रयाण करतील.
दरम्यान मुख्यमंत्री केजरीवाल यांचं औरंगाबाद विमानतळावर आगमन झालं यावेळी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं.