मुंबई : सातारा (Satara) जिल्ह्यातील कोयना धरण (Koyna Dam) आणि रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील पोफळी इथल्या जलविद्युत प्रकल्पांना भेट देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) हे कोयना आणि पोफळीच्या दौऱ्यावर आहेत. कोयनानगर इथे ते दाखल झाले आणि पोफळीच्या दिशेने रवाना झालेत. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि सातारचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित आहेत.. सुरुवातीला मुख्यमंत्री हे कोयनानगरहुन पोफळीला जाणार , त्यानंतर दुपारी १२ वाजता ते पुन्हा कोयनानगरला पोहचून कोयना धरणाची पाहणी करणार आहेत. 


हरित क्रांतीला चालना धरण म्हणून कोयना धरणाला ओळखले जात..पण याच धरणाची अनेक काम ही ठप्प तर काही काम संथ गतीने सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोयना धरणाच्या दौऱ्यावर येत आहेत.