मेघा कुचिक, झी मीडिया, महाड : महाडमध्ये काही दिवसांपूर्वी तळीये गावात (Mahada Taliye landslide) दरड कोसळली. या दुर्घटनेत अनेकांचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेची केंद्र सरकारकडूनही (Central Government) दखल घेण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray Visit Taliye) यांनी घटनास्थळी 2.15 मिनिटांनी भेट दिली. त्यांनी झालेल्या नुकसानाची पाहणी केली. गावकऱ्यांचा सांत्वन केलं. तसेच त्यांनी गावकऱ्यांना धीर देण्याचाही प्रयत्न केला. (Chief Minister Uddhav Thackeray visited the victims of Mahad Taliye landslide) 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री काय म्हणाले?  


तुमच्यावर  मोठा प्रसंग कोसळलेला आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:ला सावरा. बाकी इतर गोष्टी या सरकारवर सोडा. आम्ही तुमचं पुनर्वसन करु. सरकारकडून सर्वांना मदत दिली जाईल. असं आश्वासन देत मुख्यमंत्र्यांनी तळीये गावकऱ्यांचा दिलासा देण्याचा प्रयत्न केला. यावेळेस मुख्यमंत्र्यांसोबत मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार सुनिल तटकरेही उपस्थित होते.  



सुरक्षितस्थळी पुनर्वसन करणार


दरम्यान यावेळेस मुख्यमंत्र्यांनी तळीये ग्रामस्थाना सुरक्षित ठिकाणी हलवणार असल्याची माहिती दिली. "तळीयेसारख्या डोंगरउतारावर असलेल्या गावांचं सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन केलं जाईल",  असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.