मुंबई : Mahad Taliye Landslide : रायगडमधील तळीयेच्या दुर्घटनेने सगळा महाराष्ट्र हळहळला. एका क्षणात होत्याचं नव्हतं झाले. एका क्षणात डोंगराच्या ढिगाऱ्याखाली आख्खं गाव गाडले गेले. पुण्यातील माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती या दुर्घटनेतून पाहायला मिळाली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) तळीये गावाला (Taliye village) भेट देणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज दुपारी 12.45 वाजता दरड कोसळून गाडल्या गेलेल्या महाड तालुक्यातील तळीये गावाला भेट देणार आहेत. मुंबईतून हेलिकॉप्टरने महाड एमआयडीसीला जाणार आहेत. तिथून मुख्यमंत्री मोटारीने तळीयेला पोहोचणार आहे. रत्नागिरी आणि साता-यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाच्या अंदाजानं चिंतेत भर तर कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग, ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट


रायगड जिल्ह्यात दरडीखालून आतापर्यंत दरडीखालून 49 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. महाड तालुक्यातील हे तळीये गाव नष्ट झाले आहे. महाड तालुक्यात तळीये 38, पोलादपूर तालुक्यात साखर सुतारवाडी इथं 5 तर पोलादपूर तालुक्यातच केवनाळे इथं 6 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.



दरम्यान, साताऱ्यात मिरगावातही दरड कोसळून 12 ठार झाले आहेत. आंबेघरमध्ये 17 जण दरडीखाली अडकल्याची भीती आहे. तर रत्नागिरीतल्या पोसरेत 4 जण ठार झाले असून 13 जण बेपत्ता आहेत.


सांगलीत कृष्णा नदीची पाणीपातळी धोका पातळीवर, अनेक उपनगरांत पाणी, जिल्ह्यातली 86 गावं पुराने वेढली आहेत. सांगली-कोल्हापूर संपर्क तुटला आहे. तसेच कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील पुराचा मुंबईलाही फटका  बसला आहे. मुंबईला येणाऱ्या दुधाचा पुरवठा बंद आहे. मुंबईतही दुधटंचाईची शक्यता आहे.