ED कारवाईनंतर मुख्यमंत्र्यांची आक्रमक भूमिका, भाजपच्या नेत्यांवर कारवाईचा इशारा
Chief Minister Uddhav Thackeray`s aggressive : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) कारवाईबाबत मुख्यमंत्र्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
मुंबई : Chief Minister Uddhav Thackeray's aggressive : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) कारवाईबाबत मुख्यमंत्र्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपच्या नेत्यांवर कारवाईचा इशारा श्रीधर पाटणकर यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विरोधक हेच करत राहणार, आपण लढत राहायचे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील भाजपच्या खात्यांचा ट्रॅक रेकॉर्ड काढा आणि पुढची पावले उचला, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. राज्यातील भाजपच्या दोन-चार नेत्यांना तुरुंगात टाकल्याशिवाय आपल्याविरुद्ध केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू असलेल्या कारवाया थांबणार नाहीत. ते बदल्याच्या भावनेने वागत असतात आपण का शांत बसायचे का, असा संताप मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांनी व्यक्त केल्याची माहितीही सुत्रांकडून मिळत आहे.
ईडीने (ED) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्या ग्रुपचे 11 फ्लॅट जप्त केले. 6.25 कोटी रुपयांची ही स्थावर मालमत्ता आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सत्ताधारी महाविकास आघाडीतील पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केंद्रीय तपास यंत्रणा तैनात करून राज्य सरकार आणि नेत्यांना टार्गेट करण्याऱ्या भाजपशी दोन हात करण्याचा एकमताने निर्णय घेतला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, तुम्ही आपआपल्या खात्यातील आधीच्या पाच वर्षातील प्रकरणांच्या फायली तयार करा, शेवटी माझी मदत घ्या, अशी माहिती पुढे आलेय.