आई - वडिलांच्या भांडणात पाच वर्षांच्या चिमुरड्याचा बळी
आई - वडिलांच्या भांडणात नाशिकमध्ये पाच वर्षांच्या चिमुरड्याचा बळी गेला आहे.
नाशिक : आई - वडिलांच्या भांडणात नाशिकमध्ये पाच वर्षांच्या चिमुरड्याचा बळी गेला आहे. बाप आईला बॅटने मारहाण करताना मुलाच्या वर्मी फटका बसल्याने तो लहानग्याच्या जीवावर बेतला. पित्याने त्याच्या आईला आणि त्याला बॅटने मारहाण केली. पत्नी - पतीत वाद झाला आणि वादातून मोठे भांडण झाले. त्यानंत संतप्त पतीने पत्नीसह मुलाला जबर मारहाण केली. त्यानंतर लहानग्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान, या लहानग्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी चिमुरड्याच्या पित्याला नाशिक उपनगर पोलिसांनी अटक केली आहे.
आर्यन या चिमुरड्याची आई आणि वडील यांच्यात भांडण झाले. चारित्र्याच्या संशयावरून वाद झाला. या वादाचे स्वरुप हाणामारीत झाली. आर्यनचे वडील भीमराव यांनी जवळच असलेल्या बॅटने आईला मारहाण केली. यातच आर्यन रडू लागल्याने वडील भीमराव याने आर्यनलाही मारहाण सुरू केली. आर्यनच्या डोक्यात बॅट लागल्याने आर्यन गंभीर जखमी झाला. आर्यनला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला मुंबईला जे जे रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान आर्यनचा मृत्यू झाला.
दरम्यान, या प्रकरणी नाशिकच्या उपनगर पोलिसांनी आर्यनचे वडील भीमराव यांना अटक केली आहे. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आली आहे. तसेच मारहाणीत वापरलेली बॅटही ताब्यात घेतली आहे.
दरम्यान, आर्यनचे आजोबा भिसे यांनी याबाबत सांगितले, आम्हाला दोन दिवसांपूर्वी संध्याकाळी फोन आला होता. पती-पत्नीत किरकोळ वाद झाला आहे. त्यावरून आम्ही लगेच नाशिकला आलो आणि कळले की मुलीला आणि नातवाला मारहाण झाली आहे. घरामध्ये रात्रीच्या वेळेला भांडण झाले आणि त्या वेळेला हे सगळं घडले. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. लहान मुलगा होता आणि सगळं चांगलं होते. भांडण झालं होतं आम्ही मुलीला म्हणत होतो नाशिकला जाऊ नको. मात्र त्यांनी ऐकलं नाही आणि रात्रीच्या वेळी आधीच्या भांडणाची कुरापत काढली आणि मारहाण केली आहे. यामध्ये मुंबईत त्यांचेवर उपचार सुरू होते. मात्र त्याचा मृत्यू झाला.
पती-पत्नीच्या वादामध्ये एका लहान मुलाचा मृत्यू झालेला आहे. यासंबंधी रात्रीच्या वेळेला पत्नी आणि पत्नीचे भांडण झाले होते. त्यावेळी लहान मुलगा रडायला लागला म्हणून त्याच्या डोक्यात मार लागला. त्याला सुरुवातीला जवळच्या एका रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होतं. मात्र, त्यानंतर मुंबईला जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र मार जास्त लागल्याने त्याचा मृत्यू झालेला आहे. याप्रकरणी मुलाचे वडील भीमराव खंडारे याला अटक केले आहे. आणि त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, अशी माहिती उपनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विकास लोंढे यांनी दिली.