Trending video : आज बालदिन...आज चाचा नेहरू म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती...त्यानिमित्ताने देशभरात आज बालदिन साजरा करण्यात येतो. सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक मजेदार व्हिडीओ पाहिला मिळतात. घरात लहान मुलं असेल तर घरातील वातावरण आनंदी असतं. घरातील प्रत्येकाचा वेळ या चिमुकल्याचा आजूबाजूला जातो. कितीही कामाचा ताण असो किंवा थकवा लहान मुलाच्या क्यूट गोष्टींपुढे आपण क्षणात प्रसन्न होऊन जातो. आज बालदिनानिमित्त आपण सोशल मीडियावर ट्रेंड झालेले काही व्हिडीओ पाहूयात...(Children's Day 2022 Trending Child Funny video Viral On Social nmp)


Viral Video : 


जेव्हा आजी पप्पांना रागवते!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर चिमुकल्याचा एक व्हिडीओ सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक आजी जेव्हा पप्पांना रागवते त्यानंतर चिमुकल्याला हसू आवरतं नाही. जशी जशी आजी पप्पांना रागवते तसं तसं चिमुकल्याचा आनंद गगनात मावतं नाही. खुदूखुदू हसणारं हे बाळ नेटकऱ्यांचं मनं जिंकतंय. 



Anushrut Video :


अरे यार मत काटो! 


तुम्हाला तो चिमुकल्याचा व्हिडीओ आठवतो का ज्यात एक चिमुकल्या केस कापताना तुफान रडतं होता. त्यात मजेदार गोष्ट म्हणजे रडता रडता तो जे काही बडबड करत होता त्याची ही बडबड नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं होती. बालदिनानिमित्त असेच काही मजेदार व्हिडीओ पाहा. 



Funny Indian Kids Video :


मनं जिंकणारे व्हिडीओ


सोशल मीडियावर लहान मुलांचे गंमतेशीर आणि भन्नाट व्हिडीओ पाहिला मिळतात. हे व्हिडीओ पाहून दिवसभरातील सर्व ताण नाहीसा होतो. या लहान मुलांनी संडे मंडे ज्या प्रकारे म्हटलं आहे ते ऐकून नेटकऱ्यांना नक्कीच हसू आवरणार नाही. असेच लहान मुलांचे मजेदार व्हिडीओ तुमचा दिवस बनवणार. 



मग कसे वाटले व्हिडीओ कधीही पाहावे वाटणार असे हे व्हिडीओ तुमच्या मोबाईलमध्ये नक्की सेव्ह करुन ठेवा. मन उदास असेल, कामाचा ताण, थकवा वाटतं असेल तर हे व्हिडीओ तुम्हाला नक्कीच क्षणात प्रसन्न करेल.