या चिमण्यांनो परत फिरा रे, घराकडे अपुल्या
ही मुलं शहरांतल्या रेल्वे स्थानकांवर तसंच इतरत्र राहत होती.
पुणे : रागाच्या भरात किंवा कुठल्याही कारणानं घर सोडून गेलेल्या मुलांची त्यांच्या पालकांशी गाठ घालून देण्याचं काम साथी या स्वयंसेवी संस्थेमार्फत केलं जातं. अशीच काही मुलं आणि त्यांच्या पालकांची शुक्रवारी पुण्यात भेट घडवण्यात आली. अगदी किरकोळ कारणातून या मुलांनी घर सोडलेलं होतं. घर सोडल्यानंतर पुढे काय करायचं, हे काहीच माहित नसल्यानं, ही मुलं शहरांतल्या रेल्वे स्थानकांवर तसंच इतरत्र राहत होती.
विश्वासात घेऊन त्यांच्या आईवडिलांचा शोध घेतला
साथी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या मुलांना विश्वासात घेऊन त्यांच्या आईवडिलांचा शोध घेतला आणि दोघांची भेट घडवली. डोळे ओलावणारा असचा हा प्रसंग होता. साथी संस्थेनं आजवर ताटातूट झालेल्या अशा हजारो कुटुंबांना एकत्र आणलंय.