सिंधुदुर्ग :  चिपी विमानतळासाठी अखेर मुहूर्त सापडला आहे. चिपी विमानतळावरून अखेर येत्या पाच मार्चला अधिकृतरित्या विमान उतरणार आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चांना आता पुर्णविराम मिळाला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुहूर्त सापडल्याने यावरून राजकीय चर्चाही रंगू लागल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिंधुदुर्गातील प्रतीक्षेत असलेल्या चिपी विमानतळवर अखेर येत्या 5 मार्चला पहिलं विमान अधिकृतरित्या उतरणार आहे. कोकणवासियांचं लक्ष विमान कधी लेंड होणार याकडे लागल होत अखेर मुहूर्त सापडला आहे. विमान सुरु झाल्यास यावर्षी हापुस आंबा खायला चाकरमानी थेट विमनाने गावी येऊ शकणार आहेत. अधिकृत विमानसेवा सुरु होत आहे ही कोकण वासियांसाठी खूप मोठी बातमी आहे. 


5 मार्च ला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विमनातून चिपीमध्ये दाखल होतील. यापूर्वी अगदी घाई घाईत गणपतीपूर्वी कोकणात विमान आले होते मात्र ते अधिकृत नसल्याने यावर टिका झाली होती. कोकणातील सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळावरील करण्यात आलेली हवाई चाचणी नियमबाह्य असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला होता. तर चाचणी डीजीसीएच्या परवानगीनुसारच, घेतल्याचा दावा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केला होता. 5 मार्च ला विमानसेवा सुरु करण्यासाठी दीपक केसरकर यानी प्रयत्न केले आहेत मात्र आगामी निवडणूक आचार संहिता जाहीर होण्यापूर्वी हे उद्घाटनाचे काम उरकल जात आहे.