CIDCO Lottery 2023 : नवी मुंबईत घर घ्यायचेय ! सिडकोची पुन्हा एकदा 5000 घरांसाठी लॉटरी
CIDCO Lottery 2023 Latest Update : नवी मुंबईत सिडको लवकरच 5000 घरांसाठी लॉटरी काढणार आहे. तळोजा नोडमधील घरे सोडतीसाठी तयार आहेत. त्यामुळे घर घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे.
CIDCO Lottery 2023 Latest Update : नवी मुंबईत घर घेण्याचे स्वप्न असलेल्यांसाठी मोठी बातमी. सिडको लवकरच 5000 घरांसाठी लॉटरी काढणार आहे. तळोजा नोडमधील घरे सोडतीसाठी तयार आहेत. सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर म्हाडातून अनिल डिग्गीकर आले आहेत. त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यावर ही लॉटरी निघेल.
प्रथम येणाऱ्यास प्राधान्य
सिडको सध्या खारघर, तळोजा, द्रोणागिरी, उलवे, कळंबोली या भागात मोठ्या प्रमाणात घरं बांधत आहे. 31 मे या दिवशीच ही लॉटरी निघणार होती, मात्र त्याचवेळी सिडकोचे एमडी डॉ. मुखर्जीं यांची बदली झाली. त्यानंतर डिग्गीकर एमडी झालेत. आता त्यांचा ग्रीन सिग्नल मिळाला की लगेच लॉटरी निघेल. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वाने ही लॉटरी निघेल.
मुंबईत घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. घरांच्या किंमती इतक्या भरमसाठ वाढल्या आहेत की, घर घेणे शक्य नाही. त्यामुळे आता सर्वसामान्य लोक म्हाडा किंवा सिडकोकडून उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या घरांना अधिक पसंती दाखवतात. म्हाडा आणि सिडको परवडणाऱ्या दरात घरे मिळत असल्याने याला लोकांची कायमच पसंती मिळत आहेत. मात्र, नवी मुंबईत अनेक घरांची विक्री झालेली नाही, अशी बाबा पुढे आली आहे. सिडको घरांच्या किमतीही जास्त असल्याने लोकांची पाठ दिसून येत आहे.
सिडको आता 5000 घरांसाठी लॉटरी करणार आहे आणि एकाच टप्प्यात या घरांची विक्री करण्याची नियोजन प्राधिकरणाने आखले आहे. विशेष म्हणजे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या योजनेमध्ये सर्व घरांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. आता तळोजा नोडमध्ये ही घरे आहेत.
दरम्यान, नवी मुंबई कार्यक्षेत्रातील वाशी , जुईनगर , खारघर, मानसरोवर, उलवे, कळंबोली या परिसराच्या सिडकोच्या प्रकल्पातील घरांचा आगामी लॉटरीत समावेश करण्यात येणार आहे. येथे घरे बांधण्याचे काम जोरदार सुरु आहे. तुम्ही नवी मुंबईमध्ये घर घेऊ इच्छित असाल तर आपणास आतापासूनच आर्थिक नियोजनाला सुरुवात केली तर तुम्हालाही घर घेणे शक्य होणार आहे.