अहमदनगर : अहमदनगरमधील पारनेर तालुक्यात शिवसेनेत फूट पडलीय. शिवसेनेचे आमदार विजय औटी आणि तालुका अध्यक्ष निलेश लंके आमने-सामने आलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेचे पदावरून काढण्यात आलेले तालुकाप्रमुख निलेश लंके यांनी आपला वाढदिवस साजरा करताना जोरदार शक्ती प्रदर्शन केलं.  असंच शक्ती प्रदर्शन निलेश लंके यांनी चार दिवसापूर्वी झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या सभेच्यावेळी केल्यानं आणि नंतर आमदार विजय औटी यांच्या गाडीवर दगडफेक झाल्यानं त्यांना त्याची किमत मोजावी लागली होती.  


पदावरून हटविण्यात आलं असलं तरी आपण शिवसैनिक आहोत. आता रडणार नाही लढणार असं सांगत त्यांनी पुढील पारनेर विधानसभा निवडणुकीच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ होणार असल्याचे संकेत दिले.