सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड: इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या अवघ्या 10 वर्ष वयाच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. नांदेड जिल्ह्यातील ( Nanded District ) आदिवासी आश्रम शाळेत (4 standaed girl hanged herself) हा प्रकार घडला. हदगाव तालुक्यातील केदारगुडा येथे आदिवासी विभागाची आश्रम शाळा आहे. माळझरा येथील विश्रांती देशमुखे ही विद्यार्थिनी या शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकते. काल सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास बेडला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या अवस्थेत ती आढळून आली. काल साडेचार वाजता शाळा सुटली. त्यानंतर विश्रांती आपल्या वसतिगृहातील (girls hostel) खोलीमध्ये गेली होती. विश्रांतीच्या खोलीत तिच्या दोन मोठ्या बहिणी ज्या इयत्ता सहावी आणि सातवीमध्ये शिकतात त्याही तिथे राहतात. पण काल त्या दोघी बहिणी शाळा सुटल्यावर मैदानात खेळत होत्या तर विश्रांती एकटीच खोलीमध्ये गेली होती. 5 वाजताच्या सुमारास त्या दोघी खोलीकडे गेल्या पण दरवाजा आतमधून बंद होता. दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी ही बाब शिक्षक आणि वॉर्डला (nanded crime news) सांगितली. दरवाजा उघडण्यात आल्यानंतर विश्रांती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. (Class 4 girl hanged herself in adivasi ashram school in nanded district maharashtra news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विश्रांतीच्या खोलीत दोन मजले असलेले बेड आहेत. त्यावरील बेडच्या लोखंडी रॉडला ओढणी बांधून तिने गळफास घेतल्याचे दिसून आले. कुटुंबीयांना (family demands investigation) ही बाब कळाल्यानंतर त्यांनी धाव घेतली. चौथी मधील मुलीने अश्या प्रकारे गळफास घेतल्याची माहिती पसरल्यानंतर शेकडोचा जमाव तिथे आला. सहाय्यक पोलीस अधीक्षक आणि आदिवासी विकास प्रकल्प अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. जमाव जमाल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


अवघ्या 10 वर्ष वयाच्या मुलीने गळफास घेतल्याने तसेच साडेसहा फूट उंच दरवाजा आतून बंद असल्याने वडिलांनी व्यक्त केला संशय 


विश्रांतीच्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता असे सांगितल्या जात आहे. पण हा दरवाजा जवळपास साडेसहा फूट उंच आहे. दरवाजाला मध्याभागाची कडी नाही केवळ वर कोंडी आहे. तेव्हा अवघ्या 10 वर्ष वयाच्या विश्रांतीने आतून कडी कशी लावली? असा प्रश्न तिचे वडील बाळू देशमुखे (victims father) यांनी उपस्थित केला आहे. कुटुंबीय तिथे पोहोचण्याआधीच तिचा मृतदेह खाली का काढण्यात आला असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.


हेही वाचा - बळीराज्याच्या हातात आलेला घास बकऱ्यांच्या तोंडात!


याआधीही घडली होती घटना! 


महिनाभरापूर्वी याच आदिवासी आश्रम शाळेत एका मुलीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पण त्यावेळी हे प्रकरण दाबण्यात आले. या वसतिगृहात शिक्षक राहत नाहीत. पूर्णवेळ अधिक्षिका रुजू नाहीत. त्यामुळे या घटनेला आश्रम शाळा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप मयत मुलीच्या गावाचे माळझरा (Malzara news) येथील सरपंच रघुनाथ खोकले यांनी केला आहे.


इन कॅमेरा शवविच्छेदन


घटनेचे गांभीर्य पाहून इन कॅमेरा शवविच्छेदन (post mortem) करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत. तहसीलदारांच्या उपस्थित इन कॅमेरा शवविच्छेदन केले जाणार आहे.


शवविच्छेदन अहवालानंतर आत्महत्या की घातपात स्पष्ट होणार


विश्रांतीचे इन कॅमेरा शवविच्छेदन होणार आहे. तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला. काही घातपात झाला का हे स्पष्ट होईल. त्यानंतर आवश्यकतेनुसार यात कलमांची वाढ करण्यात येईल. सध्या याप्रकरणी मनाठा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची (death) नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिली.