पंढरपूर : स्वच्छता आणि पर्यावरण विषयीच्या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाव नोंदवणाऱ्या आणि विजेत्या दिंड्यांचा गौरव पंढरपूरमध्ये झी  २४ तासच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वच्छतेचा ध्यास झी २४ तास आणि आपलं गाव स्वच्छ गाव या संकल्पनेद्वारे झी  २४ तासने पंढरपूरच्या वारीमध्ये यंदा एक अनोखी संकल्पना राबवली. वारीच्या वाटेवर ज्या चार दिंड्या स्वच्छता आणि पर्यावरण विषयक सातत्याने जागर करतील त्या दिंड्यांची निवड सर्वोत्कृष्ट दिंडी म्हणून करण्याचे झी  २४ तासने ठरवले होते. 


वारीमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारे राबविल्या गेलेल्या उपक्रमांना वारक-यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. अनेक ठिकाणी वारक-यांनी स्वच्छता आणि पर्यावरण विषयीच्या या उपक्रमात उत्स्फुर्तपणे सहभाव नोंदवला. या विजेत्या दिंड्यांचा गौरव पंढरपूरमध्ये झी  २४ तासच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.  


ज्ञानेश्वर महाराज दिंडीतले वासकर महाराज दिंडी क्रमांक १, माहेश्वरी दिंडी क्रमांक ४५, दिंडी क्रमांक ८६, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ युवा दिंडी, तसंच तुकाराम महाराजांच्या दिंडीतले म्हातारबाबा पाथरूडकर दिंडी, संतकृपा प्रासादिक दिंडी, श्री विठ्ठल रूक्मिणी प्रासादिक दिंडी कुरूळी, आणि पंढरपूरची माई दिंडी या पुरस्कार विजेत्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.