अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसब्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. या पावसामुळे अक्षरश: दाणादाण उडवून दिली. अनेकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं. तर काही भागात दुचाकीही वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. (cloudy rain in shirajgaon at chandur bazar taluka of amravati)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर दुसऱ्या बाजूला अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शेकडो क्विंटल शेतमाल भिजला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं. त्यामुळे आता पेरणी करायची कशी असा सवाल शेतकऱ्यांसमोर उपस्थित झालाय.


आजपासून मुसळधार पावसाचा अंदाज


राज्याच्या अनेक भागात आजपासून मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवण्यात आला आहे. तसंच येत्या पाच दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाण्यातही रविवारपासून मुसळधार पावसाची शक्यता आहे. 


पुढील 2 दिवस राज्यातील विविध भागांत वादळी वा-याचीही शक्यता आहे. त्यानंतरच्या 3 दिवसांपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.