मुख्यमंत्र्यांकडून शरद पवारांवर स्तुतीसुमनं
![मुख्यमंत्र्यांकडून शरद पवारांवर स्तुतीसुमनं मुख्यमंत्र्यांकडून शरद पवारांवर स्तुतीसुमनं](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2017/10/23/250872-pawar-cm.jpg?itok=JeVPlYWa)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा अमरावतीमध्ये सर्वपक्षीय सत्कार करण्यात आला.
अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा अमरावतीमध्ये सर्वपक्षीय सत्कार करण्यात आला.
राजकीय आणि संसदीय कारकीर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शरद पवारांचा गौरव करण्यात आला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण मात्र कार्यक्रमाला प्रकृती अस्वस्थामुळे अनुपस्थित राहिलेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणादरम्यान शरद पवारांचं कौतुक केल्याचं पहायला मिळालं. शरद पवार हे दिलदार विरोधक असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
तसेच शरद पवारांनी विविध क्षेत्रात मोठं काम केलं आहे, कृषी क्षेत्रात पवारांचे योगदान मोठं असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलयं.
शहर आणि जिल्ह्यातल्या सर्व राजकीय नेत्यांनी मिळून या सोहळ्याचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला आनंद अडसूळ, गृहराज्यमंत्री रणजित पाटील उपस्थित होते. अमरावतीच्या शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या मैदानावर हा कार्यक्रम झाला.