ऑक्टोबरमध्ये कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात - मुख्यमंत्री

ऑक्टोबर महिन्यात कर्जमाफीचे पैसे शेतक-यांच्या खात्यात जमा होतील, अशी व्यवस्था सरकारनं केली आहे.
पुणे : ऑक्टोबर महिन्यात कर्जमाफीचे पैसे शेतक-यांच्या खात्यात जमा होतील, अशी व्यवस्था सरकारनं केली आहे.
त्यामुळे दिवाळीपूर्वी शेतक-यांना पैसे मिळतील अशी माहिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात दिली. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा शताब्दी सांगता सोहळा पुण्यामध्ये सुरु आहे.
या कार्यक्रमानिमित्तानं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, एकाच मंचावर उपस्थित आहेत.