Video : दिलेला शब्द पाळत मुख्यमंत्री फडणवीस कोपर्डीतील पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला हजर; दरेंकरांनी म्हटली मंगलाष्टकं...

Viral Video : मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये व्यग्र असतानाची देवेंद्र फडणवीस यांनी एका महत्त्वाच्या ठिकाणी हजेरी लावली.
Maharashtra Viral Video : 2016 मध्ये अहमदनगरमधील कोपर्डी इथं घडलेल्या दुर्घटनेनंतर या घटनेतील पीडितेला 2017 मध्ये खऱ्या अर्थानं न्याय मिळाला. जिथं तिच्यावर अत्यातार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. याच दुर्घटनेतून सावरणाऱ्या कुटुंबात यंदाच्या वर्षी सुखाचे क्षण आले, जिथं पीडितेच्या बहिणीचा विवाहसोहळा पार पडला.
हा विवाहसोहळा अधिक खास आणि जबाबदारीचा ठरला, कारण इथं खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उल्लेखनीय उपस्थिती पाहायला मिळाली. पीडितेच्या बहिणीच्या लग्नाची जबाबदारी आपण स्वत: स्वीकारून लग्नसोहळ्यासाठी उपस्थित राहणार असा शब्द फडणवीसांनी त्यावेळी या कुटुंबाला दिला होता आणि अखेर त्यांनी हा शब्द पाळला. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी X च्या माध्यमातून या विवाहसोहळ्यातील फोटो शेअर करत फडणवीसांचं कौतुक केलं.
हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : मोठ्या विश्रांतीनंतर राज्यात थंडीचा कडाका वाढला; पुढील 24 तासात 'इथे' वाढणार गारठा
आमदार प्रविण दरेकर यांनी या विवाह सोहळ्यात मंगलाष्टका गाऊन वधू वर नव दाम्पत्याला शुभेच्छाही दिल्या. या क्षणाविषयी सांगताना दरेकर लिहितात, 'शब्दांचे पक्के... असे आहेत आमचे नेते
मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजी! कोपर्डीत 8 वर्षांपूर्वी एक दुर्दैवी घटना घडली होती. राज्याचे मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून पीडित कुटुंबीयांशी संवाद साधला होता. कुटुंबीयांनी पीडितेच्या बहिणीच्या लग्नाबद्दल चिंता व्यक्त केली. तेव्हाच तिच्या लग्नाची जबाबदारी मी घेतो आणि त्या लग्नालाही मी आवर्जून येईन, असा शब्द दिला होता.
आज तो दिवस उगवला आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी त्या लग्नसोहळ्याला हजेरी लावत आपला शब्द पाळला. वधू-वराला भरभरून आशिर्वाद दिले. नेता असावा तर असा, दिलेला शब्द पाळणारा!
या लग्नात मंगलाष्टक म्हणण्याची संधी मला लाभली, कुटुंबीयांनी ती संधी मला दिली, त्याबद्दल मी मनापासून त्यांचा आभारी आहे. सुजय विखे पाटील, राम शिंदे हे सुद्धा यावेळी उपस्थित होते.'
नेतेपणाची जबाबदारी स्वीकारण्यासोबतच समाजाप्रती असणारं आपलं देणं आणि याच समाजाशी असणारं आपलं नातंही तितकंच महत्त्वाचं असतं हाच महत्त्वाचा संदेश फडणवीस आणि दरेकरांच्या या कृतीतून सर्वांपुढे अधोरेखित झाला असं म्हणायला हरकत नाही.