`मराठवाड्याला सुजलाम सुजलाम करू`
मराठवाड्याला सुजलाम सुफलाम करणं हे आपलं उद्दीष्ट असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.
औरंगाबाद : मराठवाड्याला सुजलाम सुफलाम करणं हे आपलं उद्दीष्ट असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते औरंगाबादच्या सिद्धार्थ गार्डन येथील स्मारक येथे ध्वजारोहण करण्यात आलं. मुक्तीसंग्रामात ज्यांनी प्राण पणाला लावले त्यांना मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केलं. यावेळी पोलिसांनीही मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांना मानवंदना दिली.
जे स्वातंत्र्य सैनिक हयात आहे त्यांना भेटून मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या. या स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी मोठे योगदान दिले, ते स्वामी रामानंद तीर्थ, आणि गोविंदभाई श्रॉफ यांनाही अभिवादन करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील सर्व जनतेला मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. सोबतच मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कृष्णा खोऱ्यातून मराठवाड्याला मिळणार असल्याचे सांगितले तर जलयुक्त शिवार ने मराठवाड्याचा कायापालट करण्याचा प्रयत्न केल्याचंही मुख्यमंत्री म्हणालेत.