मुंबई : जम्मू,श्रीनगर आणि लडाखमध्ये भयमुक्त तिरंगा फडकवण्याची संधी आपल्याला मिळाल्याने आजचा स्वातंत्र्य दिन महत्वाचा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ७३ व्या स्वातंत्र्यदिनाच्या प्रसंगी ते बोलत होते. याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह तसेच भारतीय संसदेचे त्यांनी अभिनंदन आणि आभार मानले.  महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात  गेल्या 10-15 दिवसात पूरपरिस्थिती आहे. राज्य शासन, एनजीओ, नेव्ही, आर्मी, तटरक्षक दल, एनडीआरएफ, एसडीआरएफ यांनी मेहनत करून पुराच्या तडाख्यातुन बाहेर काढलं. जवळजवळ 5 लाख नागरिकांना बाहेर काढलं यशस्वी काम केलं त्याचा आनंद असल्याचेही ते म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याचवेळी मोठं आव्हान ज्यांचे संसार उध्वस्त झाले. त्यांच्या भविष्याची भावीतव्याची चिंता सर्वत्र आहे. शा नागरिकांच्या पाठी भक्कम उभे राहून त्यांना उभं करण्याचं काम महाराष्ट्राला करावं लागेल असे आवाहनही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. 


शासनाने 6 हजार 800कोटी रुपयांचे भक्कम पॅकेज तयार करून या माध्यमातून पुनर्वसनाचे कार्य वेगाने व्हावे यासाठी प्रयत्न सुरू केला आहे.   ज्या नागरिकांना त्रास सहन करावा लागला त्यांचे पुनर्वसन रेकॉर्ड वेळेमध्ये करून त्यांच्या जीवनामध्ये आनंद आणू हा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संपूर्ण महाराष्ट्र पुरग्रस्तांच्या आणि आमच्यापाठी उभा राहिला यासाठी त्यांनी सर्वांचे आभार मानले. 


मागील पाच वर्षात सरकार सामान्य माणसाच्या पाठी उभे असून शेतकरी, शेतमजूर, आदिवासी महिला या सर्वांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तनाचा करता येईल याचा प्रयत्न केल्याचेही ते म्हणाले. विशेषतः शेतीमध्ये गेल्या 5 वर्षात दीड लाख कोटींची अभूतपूर्व गुंतवणूक केली असून 50 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या विविध योजनांचा माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात दिल्याचेही त्यांनी म्हटले. 



महत्त्वाचे मुद्दे 


जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्राला परिपूर्ण करण्याचा प्रयत्न 
दुष्काळ संकट 3 ते 4 वर्ष भोगले आहे 
येत्या काळात महाराष्ट्राला दुष्काळमुक्त कारण्याचा संकल्प आहे. 
वाहून जाणारे पाणी उचलून दुष्काळी भागात देणार
167 टीएमसी पाणी मराठवाड्यात आणण्याचा प्रयत्न
वैनगंगेतील तेलंगणा आणि समुद्रात वाहून जाणारे पाणी विदर्भाच्या दुष्काळी भागात आणणार 
दुष्काळी भागातील प्रकल्प गतिमान करणार 
गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रातील अर्थव्यवस्था भक्कम आहे.
शिक्षण उद्यावगमध्ये महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक
औद्योगिक क्षेत्रात प्रथम क्रमांक लागतो 
एफडीएमध्ये 50 टक्केपेक्षा जास्त गुंतवणूक आणली 
वंचितांना पर्यंत विकास पोहचवण्याचा प्रयत्न