यंत्रणा वेळेत पोहोचली पण... मुख्यमंत्र्यांनी सांगितलं घटनास्थळी नेमकं काय घडलं
Samruddhi Mahamarg Accident: झालेल्या अपघातात संपूर्ण बस जळून खाक झाली. मात्र आता पुन्हा एकदा अपघाताची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण प्रामुख्याने बसचा टायर फुटल्यानेच हा अपघात झाल्याचे बोललं जात आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातस्थळी भेट दिली.
Samruddhi Mahamarg Accident: शुक्रवारी मध्यरात्री पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) आतापर्यंतच सर्वात मोठा भीषण अपघात झालाय. बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण बस अपघातात (Bus Accident) 25 प्रवाशांचा बसला लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. नागपूरहून ही बस पुण्याकडे चालली होती. त्यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा गावाजवळ टायर फुटल्याने बस पलटली आणि डिझेलच्या टाकीने पेट घेतला. टाकी फुटताच संपूर्ण बसने काही क्षणात पेट घेतला आहे. यामध्ये संपूर्ण बस जळून खाक झाली. मात्र आता पुन्हा एकदा अपघाताची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण प्रामुख्याने बसचा टायर फुटल्यानेच हा अपघात झाल्याचे बोललं जात आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातस्थळी भेट दिली.
समृद्धी महामार्गावर झालेल्या या दुर्घटनेत 25 लोकांचा मृत्यू झाला. 8 जण बसमधून बाहेर पडले. जखमींवर उपचार सुरु आहेत. दुर्देवाने 25 जणांना वाचवता आले नसल्याची खंत मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली.
अपघात होताच पोलीस, फायर ब्रिगेड, डॉक्टर ही सर्व यंत्रणा वेळेत पोहोचली. पण दरवाजा बंद असल्याने त्यांना काही हालचाल करता आली नसल्याचे ते म्हणाले.
समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातामध्ये मानवी चुकांमुळे जास्त अपघात होत आहे. अशा दुर्घटना होऊ नयेत. प्रवाशांना सुरक्षित नेण्याची जबाबदारी ड्रायव्हरची असते. पण अनेकदा हे होत नाही. समृद्धी महामार्गावर काऊन्सेलिंग सेंटर उभारण्यात आले आहे. यासाठी प्रवाशांच्या नाराजीला सामोरे जावे लागते, असेही ते यावेळी म्हणाले. अपघात होऊ नये यासाठी जे काही करायचे ते सरकार करेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.