ShivSena Symbol : शिवसेना आणि धनुष्यबाण हे मुळ चिन्ह गोठवण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला होता. केंद्रीय निवडणूक आयोगानं दोन्ही गटांना नवी नावं आणि चिन्ह सादर करण्यास सांगितल्यानंतर आता दोन्ही गटाला नवी ओळख मिळाली आहे. अशातच आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ट्विट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे  (BalasahebThackeray)यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय झाला. आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार…, असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं. त्याचबरोबर '#बाळासाहेबांची_शिवसेना' हा हॅशटॅग देखील एकनाथ शिंदे यांनी वापरलाय.


ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळाले आहे. उद्धव ठाकरे गटाकडून मशाल, उगवता सूर्य आणि त्रिशूळ या 3 चिन्हांची मागणी केली गेली होती. तसेच ठाकरे गटाच्या पक्षाचे नाव शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असं असणार आहे. त्यावर आता ठाकरे गटाकडून जल्लोष साजरा केला जातोय.



दरम्यान, अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाचे 'शिवसेना' नाव आणि 'धनुष्यबाण' चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे गटाला मशाल चिन्ह मिळालंय. मात्र शिंदे गटाला कोणतंही निवडणूक चिन्ह अद्याप मिळालं नाही. अशातच आता निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पर्याय सुचवण्याचे निर्देश दिले आहेत.