नाशिक : नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील इंक्युबिटरच्या कमी क्षमते अभावी होत असणारी नवजात बालकांचे मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तातडीची बैठक बोलाविली आहे. इन्क्युबिटरमध्ये १८ बालकांची क्षमता असताना ५० बालकांवर उपचार केले जात असताना अर्भकांच्या मृत्युचे प्रमाण वाढलेय. 


या प्रकरणी आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी शनिवारी जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. भेटी दरम्यान लवकरच इंक्युबिटरची संख्या वाढविणार असल्याचे आश्वासन सावंत यांनी दिले होते त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलविल्याने विभागीय आयुक्तांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देवून परिस्थितीची पाहणी केली आहे. त्यांच्या माध्यमातून अहवाल सदर केला जाणर आहे. तसच संदर्भ सेवा रुग्णालयात स्वतंत्र शिशु विभाग स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला जाणार आहे.