`सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ टिळकांनी रोवली`
सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ लोकमान्य टिळकांनी रोवली असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
पुणे : सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ लोकमान्य टिळकांनी रोवली असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सव निमित्ताने आयोजित विविध कार्यक्रमांचा पुण्यात शुभारंभ झाला. ऐतिहासिक शनिवार वाड्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाचा शुभंकर तसंच ध्वजाचं अनावरण यावेळी करण्यात आलं. गणेशोत्सवाचा उपयोग लोकमान्यांनी स्वराज्य निर्मितीसाठी केला. त्यामुळं सगळ्यांनी एकत्र येऊन गणेशोत्सवाचा उपयोग सुराज्यनिर्मितीसाठी करावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
तर सगळे वाद बाजूला सारुन भाऊ रंगारी गणपती ट्रस्टनं सामाजिक बांधिलकी दाखवावी असं आवाहन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी केलंय. दुसरीकडे वादांशिवाय करमत नाही अशी टिप्पणी पालकमंत्री गिरीश बापट यांनी केलीय.