पुणे : वॉटर कपने जलयुक्त शिवारला नवे स्वरूप दिले आहे. महाराष्ट्रात नवी क्रांती आणली आहे. महाराष्ट्रात पाण्यापेक्षा मोठे काम असू शकत नाही, असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पानी फाऊंडेशनच्या वॉटर कप २०१७ स्पर्धेतील विजेत्या गावांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात हा कार्यक्रम झाला. अभिनेता शाहरूख खान, जलसंपदा राज्यमंत्री राम शिंदे, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, पानी फाऊंडेशनचे सत्यजित भटकळ, रिलायन्स फाऊंडेशनच्या प्रमुख नीता अंबानी यावेळी उपस्थित होते.


पानी फाऊंडेशनचा संस्थापक आमिर खानला स्वाईन फ्लू झालाय. त्यामुळे आमिर खान आणि किरण राव या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. त्यांनी व्हिडियोद्वारे संपर्क साधला. वर्धा जिल्ह्यातील काकडदरा या गावाला ५० लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले. साता-यामधील भोसरे आणि बीडमधील जायभायेवाडी या गावांना ३० लाख रुपयांचे दुसरे बक्षीस विभागून देण्यात आले. तर सात-यातीलच बिदाल आणि बीडमधील पळसखेडा या गावांना २० लाख रुपयांचे तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस विभागून देण्यात आले.