आळंदी : शेतीसाठी दिवसभर वीज देऊ शकत नाही. फक्त रात्रीचीच वीज देता येऊ शकते अशी जाहीर कबुली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आळंदीमध्ये सरपंच महापरिषदेचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. विजेची कमतरता भरुन काढण्यासाठी राज्यात सोलर योजना आणली आहे. त्यातून यापुढील काळात कृषी पंपासाठी वीज दिली जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.


तर राज्याचा ग्रामीण भाग २०१९ मध्ये ग्रामीण भागात स्वतःचं घर नसलेली एकही व्यक्ती राहणार नाही. त्याचाच भाग म्हणून ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरांचा पहिला हप्ता मार्चमध्ये दिला जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.



यासाठी केंद्र सरकारच्या मदतीची वाट पाहिली जाणार नाही. राज्य सरकारनं स्वतःच्या निधीतून हे पैसे देण्याची व्यवस्था केली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. 


ही योजना यशस्वी करण्यासाठी सरपंचांनी पुढाकार घ्यावा असं आवाहनही, त्यांनी यावेळी उपस्थित सरपंचांना केलं.