पुणे : पुण्यात साहित्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम ऐनवेळी रद्द करून राजकीय कार्यक्रमांना आणि सभांना बालगंधर्व रंगमंदिर उपलब्ध करून देण्याची मागील कारभाऱ्यांची परंपरा भाजपच्या महापालिकेतील कारभाऱ्यांनीही कायम राखली आहे. बालगंधर्व रंगमंदिरात सुरू असलेले पर्यावरण संमेलन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमासाठी गुंडाळण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री रविवारी पुण्यात विविध कार्यक्रमासाठी होते. बालगंधर्व रंगमंदिरात भारतीय जनता पार्टी राजकारणात कशासाठी या पुस्तकाचं प्रकाशन होतं. मात्र त्याचवेळी बालगंधर्व रंगमंदिरात शनिवार आणि रविवार असे दोन दिवस पर्यावरण संमेलन आयोजित केलं होतं. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी आयोजकांना राजकीय शक्तीच्या दबावाचा फटका बसला आणि संमेलन गुंडाळावं लागलं.


महापालिका अधिकारी मात्र हा आरोप मान्य करायला तयार नाही. बालगंधर्वमधील कार्यक्रम रद्द करून राजकीय लोकांना बालगंधर्व रंगमंदिर खुलं करून देण्याची ही पहिली वेळ नाही. त्यामुळे सभागृह कोणासाठी आहेत सामान्यांसाठी की राजकीय लोकांसाठी असा प्रश्न विचारला जातोय.