मुंबई : Maharashtra Cabinet Meeeting News : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकासा आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राजकीय गुन्हे मागे घेण्याचा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत मंजुरी दिली आहे. नियमित कर्ज परतफेड करणारे शेतकरी 50 हजार अनुदान देण्यात येणार आहे. तसा  कॅबिनेट बैठकीत निर्णय झाला. 1 जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. (Maharashtra Political Crisis)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रिमंडळाची बैठक झाली. यावेळी  काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीचे (NCP) सर्व मंत्री उपस्थित होते. तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, परिवहनमंत्री अनिल परब, ऑनलाईन उपस्थित होते. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 2021 पर्यंतचे राजकीय गुन्हे (Political FIR) मागे घेण्यात येणार आहे. सरकार बदलल्यास होणारी अडचण टाळण्याची तजबीज या निर्णयातून करण्यात आल्याचे दिसून येत आहेत. 


विधान परिषदेच्या निवडणुकांनंतर शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) काही आमदारांसह आधी सूरत आणि त्यानंतर आसाममधील गुवाहटीत दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत 47 आमदार आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय भूकंप होऊन सत्ता पालट होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. 


आज राज्य मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या कॅबिनेटच्या बैठकीत 2021 पर्यंतचे सर्व राजकीय गुन्हे मागे घेण्याचा महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. सध्याचे सरकार राहिल की जाईल याची कोणतीच शाश्वती नसल्याने अशा प्रकारचा मोठा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.