नाशिक : मुंढेंविरोधात अविश्वास ठराव मागे घ्या असे आदेश मुख्यमंत्र्यांनी भाजपा नगरसेवकांना दिले आहेत. त्यामुळे मुंढेविरोधातील अविश्वास ठराव बारगळणार का ? असा प्रश्न विचारला जातोय. नाशिक महापालिकेत आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठरावाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तुकाराम मुंढे यांच्याविरोधात सभागृह नेते दिनकर पाटील यांच्याकडून अधिकृत पत्र नगरसचिवांना देण्यात आलंय.


प्रस्ताव मागे ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिककराचा वाढता रोष आणि आज आयोजित करण्यात आलेला वॉलक फॉर कमिशनर बघता मुख्यमंत्र्यानी थेट अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. करवाढ लादल्याच्या  कारणावरून सत्ताधारी भाजपने पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावाची खेळी पक्षावर उलटत आहे. हे लक्षात घेऊ स्थानिकांना तो प्रस्ताव मागे घेण्याची सूचना करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. 


सर्व पक्ष एकवटले 


गेल्या महिन्याभरापासून आयुक्तांविरोधात विश्वासाच्या हालचाली सुरू होत्या. पण आज सभागृह नेते दिनकर पाटील यांनी पुढाकार घेतला. राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. महापौरांनी गटनेत्यांची तातडीची बैठकही बोलावली आहे. सध्यातरी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात सर्व पक्ष एकवटलेले दिसत आहेत.