मुंबई, पुणे : Inflation Rise तीन दिवसात तीन मोठ्या शहरात सीएनजी महागला आहे. नागपूर नंतर मुंबईत सीएनजी महागला आहे. आणि आज पुण्यात सीएनजीचा दर वाढला आहे. यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यात पुन्हा एकदा इंधन दरात वाढ झाली आहे. पुण्यात सीएनजी तब्बल 6 रुपयांनी महागला आहे. आता पुण्यात एक किलो सीएनजीमागे 91 रुपये मोजावे लागणार आहेत.  तर पेट्रोल आणि डिझेलमध्येही प्रत्येकी 8 पैशांची वाढ झाली आहे. राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवरील कर कमी करुन महिनाही झाला नाही. मात्र त्याआधीच पुन्हा इंधनाचा भडका उडाला आहे.


आजपासून पुण्यात पेट्रोल 106 रुपये तर डिझेल 92 रुपयांना मिळणार आहे. त्यामुळे पुणेकरांचा प्रवास आणखी महागणार आहे. आधीच महागाईत होरपळून निघणाऱ्यांना इंधन दरवाढीचा मोठा फटका बसणार आहे.


दरम्यान, मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) सीएनजीच्या किमतीत बुधवारपासून प्रति किलो 6 रुपयांनी वाढ झाली असून, ती 86 रुपये प्रति किलो या उच्चांकावर पोहोचलाआहे. (Mumbai: CNG price goes up by Rs 6 per kg) पाईपयुक्त स्वयंपाकाच्या गॅसची किंमत प्रति युनिट 4 रुपयांनी वाढणार आहेत. तसेच 52.50 रुपये प्रति युनिट अशी विक्रमी पातळी गाठेल, ज्यामुळे संपूर्ण MMR मधील 19 लाख घरांवर परिणाम होईल.


सीएनजीसाठी, 13 महिन्यांतील ही अकरावी वाढ आहे, गेल्यावर्षी जुलै ते या वर्षी ऑगस्ट दरम्यान एकूण 36 रुपये प्रति किलो वाढ झाली आहे.