रिक्षावर फणा काढून बसला होता नाग, बदलापूर स्थानकातील व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
Cobra On Autorickshaw Viral Video: मुंबई फिरण्यासाठी सापाचा असाही जुगाड बदलापूर रेल्वे स्थानकातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
Cobra On Autorickshaw Viral Video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. साप हे सहसा जंगलात किंवा अडगळीच्या ठिकाणी जास्त प्रमाणात आढळतात. पण रहदारीच्या ठिकाणी किंवा मानवी वस्तीत साप आढळल्यास एकच खळबळ उडते. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात रिक्षाच्या मागे एक साप लटकताना दिसत आहे. हा व्हिडिओ मुंबईलगतच्या बदलापूर स्थानकातील आहे. साप रिक्षाच्या छतावर चढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्याचवेळी तिथे असलेल्या काही रिक्षा चालकांच्या हे लक्षात येते.
रिक्षाच्या मागे साप असलेला हा व्हिडिओ मुंबईतील बदलापूर रेल्वे स्थानकाबाहेरचा असल्याचं समोर येत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. @ABHIKUS44168075 नावाच्या व्यक्तीने तो ट्विट केला आहे. कॅप्शनमध्ये लिहलं आहे की, बदलापूर रेल्वे स्थानकाच्या तिकिट खिडकी जवळ हे दृश्य दिसले आहे. 30 सेकंदाच्या या व्हिडिओत दिसत आहे की साप सरपटत रिक्षाच्या छतावर जाण्याचा प्रयत्न करत आहे. तर, इतक्या रहदारीच्या वस्तीत साप आल्याने आजूबाजूला एकच गोंधळ उडाला आहे. काही जण हे दृश्य कॅमेऱ्यात चित्रीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचवेळी साप फणा काढून उभा असलेले या व्हिडिओत दिसते आहे.
12 ऑक्टोबर रोजी हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. सोशल मीडियावर तर, या व्हिडिओला हजारो व्ह्यू मिळाले आहेत. तर, अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करत मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटलं आहे की, लक्षात घ्या तो कोब्रा आहे. तर दुसऱ्याने म्हटलं आहे की नाग रिक्षावर कसा आला. तिसऱ्या युजरने म्हटलं आहे की, रिक्षातून प्रवास करत असताना निसर्गाचा आनंद घेता यावा म्हणून, अशा भन्नाट कमेंट या व्हिडिओवर आल्या आहेत.
इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओवर अनेकांनी काळजी देखील व्यक्त केली आहे. जर, या रिक्षात प्रवासी बसले असते तर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकला असता. मात्र, सुदैवाने असं काही घडलं नाहीये. तरीदेखील अशाप्रकारे मानवी वस्तीत साप आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.