नागपूर : विदर्भ, मराठवाडा काही भागात पुढील ४८  तासात थंडी लाट असण्याची शक्यता, कुलाबा वेधशाळेने वर्तविली आहे.


गोंदीयात निच्चांकी तापमान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या ४८  तासांपासून विदर्भात थंडीची लाट असून गुरुवारी रात्री  गोंदीयात निच्चांकी ७.८ अंश सेल्सिअस तापमानची तर नागपुरात ८.४ अंश सेल्सिअसपर्यंत  तापमानची नोंद झाली आहे. थंडीमुळे विदर्भात चांगलीच  हुडहुडी भरली आहे. 


नागपुरात थंडीचा एक बळी


दरम्यान थंडीच्या कडाक्यामुळे नागपुरात हुडकेश्वर परिसरात एकाला प्राणही गमवावे लागले आहे. हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुधाकर पिलपिले हे ६३ वर्षीय वयोवृद्ध बंद दुकानाजवळ बुधवारी सकाळी मृत अवस्थेत आढळले.


थंडीने त्यांचा बळी घेतल्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोलिसांनी मात्र याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.