Weather Update: राज्यात थंडीची लाट येणार, इतके दिवस हुडहूडी
Weather Update: कडाक्याच्या थंडीत ( Cold Wave) वाढ होण्याची शक्यता आहे.
मुंबई : Weather Update: कडाक्याच्या थंडीत ( Cold Wave) वाढ होण्याची शक्यता आहे. ही थंडी पुढील पाच दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे थंडी कमी न होता वाढणार आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उत्तर भारतात वाढलेल्या थंडीमुळे अनेक राज्यांत थंडीची लाट येणार आहे. लोकांना एकाच वेळी अवेळी पाऊस, दाट धुके आणि थंडीची लाट यांचा सामना करावा लागत आहे. पुढील 4 ते 5 दिवस अनेक राज्यांमध्ये दाट धुके पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. त्याचबरोबर या काळात थंडीच्या लाटेचा कहर पाहायला मिळणार आहे.
उत्तर भारतात थंडीचा प्रकोप
पुढील तीन दिवस मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली येथे कडाक्याची थंडी पडेल, असे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. दुसरीकडे, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश , सौराष्ट्र आणि कच्छमध्ये पुढील दोन दिवस थंडी कायम राहणार आहे.
तसेच महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस थंडीच्या लाटेचा तडाखा सहन करावा लागणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पंजाब, हरियाणा, चंदीगड, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य महाराष्ट्रात पुढील 5 दिवस थंडीची लाट राहील. 27 आणि 28 जानेवारीला सौराष्ट्र आणि कच्छमध्ये थंडीची लाट असेल.
आज या राज्यांमध्ये पाऊस पडेल
हवामान खात्यानुसार, जम्मू-काश्मीर, लडाख, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि उत्तराखंडमध्ये पुढील तीन दिवस पाऊस पडू शकतो. दुसरीकडे पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि उत्तर प्रदेशमध्ये आज पावसाची शक्यता आहे.
IMD इशाऱ्यानुसार, पुढील दोन ते तीन दिवस पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, बिहार, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि ओडिशामध्ये दाट ते दाट धुके राहील. याशिवाय उत्तर राजस्थान, झारखंड, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये धुक्यामुळे येत्या 24 तासात लोकांच्या अडचणी वाढतील.