नांदेड : स्पर्धा परिक्षा डमी रॅकेट प्रकरणातील १५ आरोपींना एस.आय.टी ने अटक केली आहे. डमी रॅकेट प्रकरणात आतापर्यंत ही सर्वात मोठी कारवाई असून, हे सर्व आरोपी हे डमी रॅकेटद्वारे राज्यातील विविध ठिकाणी नोकरीत सामील झाले होते. 


१५ जणांना अटक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील मांडवी या छोट्याश्या गावातून ३० हून अधिकजण स्पर्धा परिक्षेमार्फत नोकरीत सामील झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर मांडवी येथील रहिवासी योगेश जाधव या तरुणानं या डमी रॅकेटचा पर्दाफाश केला होता. अटक करण्यात आलेल्या १५ आरोपींमध्ये ९ आरोपी हे मांडवी गावातील रहिवासी आहेत. तर, ३ जण किवनवट तालुक्यातील, १ माहुर तालुक्यातील, १ नांदेड शहरातील आणि १ आरोपी हिंगोली जिल्ह्यातील आहे. 


लाखों रूपये देऊन नोकरी


हे सर्व आरोपी लाखो रुपये देऊन या रॅकेटमार्फत डमी परिक्षार्थी बसवुन शासनाच्या विविध खात्यात नोकरीला लागलेले आहेत. दरम्यान, या प्रकरणी एस आय टी प्रमुखांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे.