संभाजी भिडे यांच्याविरोधात तक्रार दाखल
संभाजी भिडे यांच्या अडचणी वाढणार
नाशिक : पुत्रप्राप्तीच्या वक्तव्याने शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे आता अडचणीत येणार आहे. संभाजी भिडे यांचा हा दावा म्हणजे गर्भनिदान कायद्याचे सरळसरळ उल्लंघन असल्याची तक्रार पुण्यातील आरोग्य विभागाकडे दाखल करण्यात आली आहे. गणेश बोर्हाडे यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केल्याने भिडे आता यांना नवीन कारवाईला सामोरे जावे लागण्याची दाट शक्यता आहे.
आंबा खाऊन मूल होतं असं वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं. इतकंच नाही तर या आंब्याच्या माध्यमातून अनेकांना अपत्य प्राप्ती करुन दिल्याचा दावाही त्यांनी केला. नाशिकच्या मेळाव्यात ते बोलत होते. तर संभाजी भिडे याचं हे वक्तव्य दुर्दैवी असून मातृत्व आणि महिलांचा अपमान करणारं आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.