शेतकरी कर्जमाफीत होणार नवा घोळ
राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीतील अडचणींचा पाढा सुरुच आहे. शेतकऱ्यांनी कोणत्या सोसायटीमार्फत कर्ज घेतले आहे याची माहिती सरकारने दिली नसल्याने भविष्यात गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
अरुण मेहत्रे, झी मीडिया. मुंबई : राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीतील अडचणींचा पाढा सुरुच आहे. शेतकऱ्यांनी कोणत्या सोसायटीमार्फत कर्ज घेतले आहे याची माहिती सरकारने दिली नसल्याने भविष्यात गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
शेतकरी कर्जमाफी योजनेपोटी पुणे जिल्हा सहकारी बॅकेला १२३ लाभार्थींची यादी प्राप्त झाली आहे. सुमारे ७० लाख ७८ हजार रुपये मंजूरही झाले. मात्र आता हे लाभार्थी शोधण्याचं दिव्य पार पाडावं लागणार आहे. कारण या शेतकऱ्यांनी कुठल्या सोसायटीमार्फत कर्ज घेतलंय याची माहीती शासनाच्या माहीती तंत्रज्ञान विभागाने दिलेली नाही.
तूर्तास लाभार्थींचा आकडा छोटा असल्याने फारशी अडचण येणार नाही. मात्र जेव्हा हा आकडा हजारात पोहोचल्यावर कर्जमाफीच्या नव्या घोळाला सामोरे जावे लागणार आहे. त्याचप्रमाणे लाभार्थींच्या पडताळणीची आणखी एक प्रकिया पार पाडावी लागणार आहे.
याविषयी पुणे जिल्हा बॅकेच्या अध्यक्षांकडून जाणून घेतलय आमचे प्रतिनिधी अरूण मेहेत्रे यांनी.