Amol Kolhe : महाविकास आघाडीत  महाबिघाडी होण्याची चिन्हे आहेत.  पुण्यात  महाविकास आघाडीत मंचरमध्ये बिघाडी झाल्याचं पाहायला मिळालं. शरद पवार पक्षाचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांच्या नागरी सत्कार कार्यक्रमात ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला. अमोल कोल्हेंनी देवदत्त निकम यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख करताच सभेतून शिवसेना कार्यकर्त्यांनी काढता पाय घेतला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिवसैनिक आणि अमोल कोल्हे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. 


अमोल कोल्हेंनी अजित पवारांना डिवचंल 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रात अजित पवार गटाला एकही मंत्रीपद न मिळाल्यानंतर खासदार अमोल कोल्हेंनी प्रतिक्रिया व्यक्त केलीय. शरद पवारांचा हात डोक्यावर असताना मिळणारी वागणूक आणि हात नसताना मिळणारी दिल्लीतली वागणूक ही लक्षात घ्या, अशा टीका करत कोल्हेंनी अजित पवारांना डिवचंलय. .यासोबतच राष्ट्रवादीचे 40 आमदार पुन्हा माघारी फिरतील, मात्र त्यांना घेणार का? असा प्रश्न कोल्हेंनी केलाय.


विधानपरिषदेवरुन महाविकासआघाडीत जुंपली


आधी लोकसभेच्या जागावरुन तर आता विधानपरिषदेच्या जागांवरुन काँग्रेस नेते उद्धव ठाकरेंवर संतापल्याची माहिती मिळतेय. विधानपरिषदेच्या जागा उद्धव ठाकरेंनी परस्पर घोषित केल्याने शिवसेनेबाबत काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी असल्याची सूत्रांची माहिती आहे.नाना पटोलेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेणंही टाळल्याने मविआत धुसफूस सुरू आहे का अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत...तर कोकण पदवीधर आणि नाशिकच्या जागेसाठीही काँग्रेस आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 


लोकसभा निवडणुकीत मविआला चांगलं यश मिळालं. त्यातही काँग्रेसने जास्त जागा जिंकल्यायत.. त्यामुळे काँग्रेसने आता बेटकुळ्या फुगवल्या आहेत.. लोकसभेत सांगलीत काँग्रेसने बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांना मदत केल्याचा आरोप ठाकरे गटाने वारंवार केला. त्यावरुनही काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये नाराजीनाट्य होतं.. त्यानंतर ठाकरे गटाने विधानपरिषदेचे चार उमेदवार परस्पर जाहीर करून काँग्रेसला दणका दिला होता. ही बाब काँग्रेसच्या नेत्यांना पटलेली दिसत नाही.