Congress Alert Over Ashok Chavan Resign: माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पक्षसदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोमवारी आपला राजीनामा सुपूर्द केला. अशोक चव्हाण आज भाजपमध्ये (BJP) पक्ष प्रवेश करणार आहेत. अशोक चव्हाण यांच्या बंडानंतर काँग्रेस नेते अलर्टवर आले आहेत. काँग्रेसच्या गोटात मोठ्या हालचाली सुरू आहेत. (Ashok Chavan Join BJP)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशोक चव्हाण आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तर, भाजपचा दावा आहे की चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे काही आमदारही आज भाजपाच येण्यास इच्छुक आहेत. काही दिवसांपूर्वीच बाबा सिद्धीकी, मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. तर, आणखी काही आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून डॅमेज कंट्रोल केले जात आहे. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले सर्व आमदारांना फोन करत आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. 


नाना पटोले काँग्रेसच्या सर्व आमदारांशी संपर्क साधत पक्षाची भूमिका स्पष्ट करत आहेत. तसंच, सर्व आमदारांना मुंबईत बोलवले आहे. आमदारांसोबत थेट प्रत्यक्ष संवाद साधत काँग्रेस पक्षासोबत राहण्याच्या भूमिकेचे आवाहन करणार आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. तर, काँग्रेसचे महत्त्वाचे नेत शरद पवारांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येतेय. 


काँग्रेस नेते घेणार शरद पवारांची भेट


काँग्रेसचे प्रभारी रमेश चैनिथला शरद पवारांची भेट घेणार आहेत. दुपारी साडेबारा वाजता यशवंत राव चव्हाण येथे ही भेट होणार आहे. यावेळी अशोक चव्हाण यांचे बंड व इतर महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 


अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश 


अशोक चव्हाण आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. आज माध्यमांशी चर्चा करताना त्यांनी ही माहिती दिली आहे. चव्हाण म्हणाले की, आज मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. पक्षप्रवेशासाठी निघालो आहे. नवीन राजकीय पर्वाची सुरुवात करत आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. काही जिल्ह्यातील लोकांचे प्रवेश ही होतील पण मी कोणालाही फोन करुन बोलवले नाही, असं सूचक वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केले आहे.