मुंबई : रत्नागिरी जिल्हात काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आलाय. चिपळूण येथील बैठकीला ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या समर्थकांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यामुळे वाद उफाळलाय. दरम्यान, राणे समर्थकांचा बैठकीत घुसण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिंधुदुर्गात नारायण राणे यांची काँग्रेस कार्यकर्त्यांची स्वतंत्र बैठक घेतली. त्याचवेळी प्रदेश काँग्रेसने बैठक आयोजित केली होती. हुसेन दलवाई यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. त्यावेळी राणे समर्थक कोणीही या बैठकीला उपस्थित नव्हते. राणे यांचीच बैठक अधिकृत असल्याचा दावा समर्थकांनी केला. जिल्ह्यातच्या राजकारणात राणेंचा शब्द महत्वाचा असल्याचे राणे समर्थकांचे म्हणणे आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे दिसून आले.



आज चिपळूणमध्ये हुसेन दलवाई यांच्याकडून बैठकीचे आयोजन करण्यात आलो होते. बैठकीला नारायण राणे समर्थकांना निमंत्रण देण्यात आलेले नव्हते. मात्र, असे असताना राणे समर्थक बैठकीत घुसण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केला. तुम्ही बैठकीला जाऊ नका, वाद वाढवू नका, असे सांगितले.  


दरम्यान, चिपळुणातील काँग्रेस बैठकीच्यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.