Maharashtra Congress : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये वाद उफाळून आला आहे. ज्येष्ठ नेत्यांनी आरोप केल्याने काँग्रेसमधील अंतर्गत वाद समोर आला. त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमधील नाराजी नाट्यासंदर्भात अहवाल अखेर लिफाफाबंद करण्यात आला आहे. हा अहवाल पक्षाच्या रायपूर इथल्या राष्ट्रीय अधिवेशनात सादर करण्यात येणार आहे. दरम्यान, राज्यातील काँग्रेस पक्षाती कोणतेही फेरबदल होणार नाहीत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  (Nana Patole) हेच राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) प्रकरणासाठी प्रदेशाध्यक्षांना जबाबदार धरले गेले होते. त्यानंतर बाळासाहे थोरात (Balasaheb Thorat) आणि नाना पटोले वाद उफाळून आला. (Congress Dispute) हे प्रकरण दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे गेल्यानंतर नाना पटोलेंना अभय दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्र काँग्रेसमधील नाराजी नाट्यासंदर्भात अहवाल अखेर लिफाफाबंद करण्यात आला आहे. हा अहवाल पक्षाच्या रायपूर इथल्या राष्ट्रीय अधिवेशनात सादर करण्यात येईल.


 जरी वादाबाबत अहवाल पाठविण्यात आला तरी राज्यातील काँग्रेस पक्षात कोणतेही फेरबदल होणार नाहीत, असे संकेत मिळत आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेच राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.  काँग्रेसचे वरिष्ठ नेते रमेश चेन्निथला यांनी राज्यातल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून हा अहवाल तयार केलाय. अहवालामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी अनेक बदल सूचवण्यात आल्याची माहिती आहे.  



सत्यजित तांबे यांनी बंडखोरीनंतर प्रदेशाध्यक्षांवर आरोप केले. त्यानंतर बाळासाहेब थोरातांनीही पक्षश्रेष्ठींकडे नाराजी व्यक्त करणारं पत्र पाठवले होते. त्यामुळे काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली. अहवालात चेन्नीथला यांनी प्रदेश काँग्रेस अध्यक्षांबाबत काही सूचना केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अहलावर काय निर्णय होणार याची मोठी उत्सुकता आहे. काँग्रेस पक्ष कार्यकारणीत काय बदल करणार याचीही उत्सुकता आहे.